शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वाहनाचे कर्ज फेडले; एनओसी कोण घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 12:09 IST

Amravati : कागदपत्रावरील कर्जाचा बोजा कमी करणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहन कर्जावर घेतले असल्यास ते कर्ज परतफेड केल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) घेऊन वाहनाच्या कागदपत्रावरील कर्जाचा बोजा कमी करणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात शेकडो वाहनधारकांनी कर्ज फेडूनही त्यांच्या नावावर बोजा नोंद असल्याचे चित्र आहे. अनेकजण वाहन खरेदी करण्यासाठी वाहन कर्ज घेतात. वाहन खरेदीसाठी अनेक वित्तीय कंपन्याही सवलतीच्या दरात व्याज देतात. बेसिक कार, प्रीमियम आणि लक्झरी कारही कर्जामुळे घेणे शक्य होते. दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे मुदतीचा कर्जाचा कालावधी आहे. मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित वाहनावरील कर्जाचा बोजा कमी केला जात आहे. ज्या वाहनावर कर्जाचा बोजा आहे, अशा वाहनाचे हस्तांतरण करण्यासाठी अथवा वाहनावरील तारणबोजा उतरवण्यासाठी वित्तदात्याची एनओसी आवश्यक असते.

कर्जाची परतफेड केल्यानंतर काय कराल..?आरटीओकडे जमा करा. वाहन कर्ज पूर्ण होताच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. न झाल्यास वाहन विक्री आणि वाहन चोरीला गेल्यास अडचण निर्माण होऊ शकते. यासाठी योग्य वेळी दक्षता घेणे गरजेचे आहे.

कर्जाची परतफेड करताना ही काळजी घ्या?आरटीओकडे जमा करा एचपी रिमूव्हल म्हणजे तुमच्या आर. सी. बुकवरून तुमच्या बँकेचा तपशील काढून टाकावा लागतो. हे काम पूर्ण न केल्यास आरटीओत तुमच्या नावावर कारची नोंद होणार नाही.

बँकेकडून एनओसी घ्या... कर्ज संपल्यानंतर बँकांकडून एनओसी घेऊन आरटीओत प्रक्रिया पूर्ण करावी लागते. वाहन कर्ज फेडल्यानंतर आणि बँकेकडून एनओसी घेतल्यानंतर आरटीओतून एचपी करणे आवश्यक

गाडीवरील कर्जाचा भार कमी करा. कर्जाचा भार कमी केल्याशिवाय वाहनांचे हस्तांतरण होत नाही. विक्री करता येत नाही.

कर्ज फेडूनही अनेक गाड्यांचा कागदपत्रावर भारबँकेकडून घेतलेली एनओसीची मुदत ही तीन महिन्यांसाठी असते. ही मिळाल्यानंतर आरटीओ कार्यालयात प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तीन महिन्यांत 'एनओसी' जमा केली नसल्यास ती पुन्हा काढावी लागते, त्यासाठी सध्या काही बँकांनी 'एनओसी'चे दरही वाढवले आहेत.

"मोटार वाहन कायद्यानुसार ज्या वाहनावर कर्जाचा बोजा आहे, अशा वाहनाचे हस्तांतरण करण्यासाठी अथवा वाहनावरील तारणबोजा उतरवण्यासाठी वित्तदात्याची एनओसी आवश्यक असते."- प्रशांत देशमुख, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती