शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
4
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
5
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
6
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
7
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
8
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
9
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
10
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
11
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
12
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
13
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
14
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
15
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
16
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
17
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
18
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
19
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
20
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

योगमय झाली अंबानगरी...

By admin | Updated: June 22, 2017 00:11 IST

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून बुधवारी २१ जून रोजी विविध शैक्षणिक, सामाजिक, संस्था, प्रशासकीय कार्यालये, ....

जागतिक योग दिन साजरा : सामाजिक, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून बुधवारी २१ जून रोजी विविध शैक्षणिक, सामाजिक, संस्था, प्रशासकीय कार्यालये, पोलीस विभाग, महापालिका, कारागृह, खासगी संस्था आदींनी योगाभ्यास केला. योगासन करुन ‘करो योग, रहो निरोग’ हा संदेश समाजाला दिला. सकाळपासून योगाच्या कार्यक्रमांनी अंबानगरी योगमय झाल्याचे चित्र अनुभवता आला.शहरात योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी, महापालिका आयुक्त हेमंत पवार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. येथील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात योग दिनाचा कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, भारत स्वाभीमान (न्यास) पतंजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हींग, योगाभ्यास मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात आयोजित कार्यक्रमाला पद्मश्री प्रभाकराव वैद्य, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी किरण कुळकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहाराध्यक्ष जयंत डेहनकर, प्रफुल्ल रोंघे, अंजली कुथे, के.के. देवनाथ, अरुण खोडस्कर, सूर्यकांत पाटील, ज्योती मोहिते, माधुरी चेंडके, प्रकाश बोके, प्रशांत वानखडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या जलतरणात मनिष देशमुख यांनी पाण्यात योगासनाचे विविध प्रकार करुन उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. नांदगाव पेठ येथील आयटीसी लिमिटेड चौपाल सागर मॉलच्या पटागंणात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रवीण रणनवरे, प्रशांत वांदे, दर्शन जोशी यांचा सहभाग होता. येथील मध्यवर्ती कारागृहात देखील आॅर्ट आॅफ लिव्हींग व दिव्या योग ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त बंदीजणांनी योगाभ्यास करुन निरोगी आरोग्याचे धडे घेतले. कार्यक्रमाला भाईदास ढोले, संतोष लोणकर, राजाभाऊ देशमुख, वंदना सावरकर, भारती मोहोकार, जयमाला देशमुख आदी उपस्थित होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरु मुरलीधर चांदेकर, कुलसचिव अजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात जागतिक योग दिन साजरा झाला. यावेळी योगतज्ञ्ज व्ही.एस. जामोदे यांनी योगासन, प्राणायम, ध्यानधारणा विषयी माहिती दिली. नितीन बोबडे, शुभांगी रवाळे यांनी मार्गदर्शन केले. अधिकारी, कर्मचारी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पोलीस आयुक्तालयाच्यावतीने येथील पोलीस कवायत मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, उपायुक्त शशीकांत सातव, प्रदीप चव्हाण आदींची उपस्थिती लक्षणीय होती. सहायक पोलीस आयुक्त अनिल पांडगळे यांच्यासह २८ पोलीस अधिकारी, ३१४ पोलीस कर्मचाऱ्यांनी योगाभ्यास केला.