शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

मन:शांती, आरोग्य संवर्धनासाठी ‘योगा’

By admin | Updated: June 21, 2015 00:38 IST

भारत भूमिला महान तपस्वी लोकांची भूमी म्हणून ओळखले जाते. ‘योग’ हा या भारत भूमिला मिळालेला वारसा असून..

राष्ट्रीय सणाचा दर्जा मिळावा : राष्ट्रसंतांनीही सांगितले योगाचे महत्त्व अमरावती : भारत भूमिला महान तपस्वी लोकांची भूमी म्हणून ओळखले जाते. ‘योग’ हा या भारत भूमिला मिळालेला वारसा असून ती देशाची एक महत्वाची ठेव आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विविध रोगांनी ग्रासलेल्या मानवजातीला ‘करा योग रहा निरोग’ हा मंत्र अगदी संजीवनी समान आहे. शरीरिक व मानसिक आरोग्य प्राप्त करुन देणारी ‘योग’ ही शक्ती मानवी आरोग्याला लागलेल्या रोगांच्या ग्रहणाला दूर सारु शकते. मानव शरीर पंचतत्वांनी बनलेले आहे. यामध्ये जल, वायू, पृथ्वी, अग्नी, आकाश या तत्वांचा समावेश आहे. या पंचतत्त्वांच्या संतुलनामुळेच हे शरीर हे स्वस्थ राहते. अगदी मोजक्याच शब्दांत योगाचे महत्व सांगायचे झाले तर योग म्हणजे सुख, शांती, समाधानाने जगण्याची कला आहे. जीवनाला संयम आणि शिस्त लावणारे ते एक शास्त्र आहे. मानवामध्ये असलेली ईश्वरीय चेतना जागविण्याचा योगा व्यतिरीक्त दुसरा मार्ग नाही. त्यामुळेच संत आणि महापुरुषांनी योगाचा नेहमी पुरस्कारच केला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत सुध्दा योगाच्या व व्यायामाच्या मानवी जीवनात असलेले महत्व अधोरेखीत करण्यात आले आहे. परदेशातही आजमितीस योगाचे महत्व पटले असून परदेशी नागरिक सद्यस्थितीत योगाचा शास्त्रोक्त पध्दतीने अभ्यास करण्यावर भर देत आहेत. परदेशी नागरिकांचा योगाबद्दलचा ओढा केनिया, शेअल्स, श्रीलंका या देशांमध्ये अनुभवता आला. भारतीय संस्कृतीचा हा अनमोल वारसा सातासमुद्रापार पोहोचविण्याचे कार्य भारतातील अनेक योग संस्थांनी केले आहे. त्यामध्ये जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा महत्त्वाचा वाटा आहे. -अरुण खोडस्कर, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक.बर्लिन आॅलिम्पिकमध्येही योग प्रात्यक्षिके१९३६ साली बर्लिन आॅलिम्पिकमध्ये मंडळाच्या तीस व्यायामपटुंनी भारतीय व्यायाम पध्दतीची प्रात्यक्षिके सादर केली होती. त्यावेळी व्यायाम प्रकारासोबत योगासने, प्राणायाम, शुध्दिक्रिया, मल्लखांबावरील योगासने सादर करण्यात आली होती. अरूण खोडस्कर यांनादेखील ३५ वर्षांपूर्वी मंडळामार्फत परदेशात योगप्रचाराची संधी मिळाली आहे. १९८० साली जापान येथे आयोजित पहिल्या जागतिक ‘झेन याग’ संमेलनाला उपस्थित राहून शुध्दीक्रियांची प्रात्यक्षिके सादर करण्याकरिता हव्याप्र मंडळाच्या चमूला मंडळाने पाठविले होते. तेव्हापासून चीन, थायलंड, सिंगापूर, हाँगकाँग, नेपाळ, केनिया, मॉरीशस, श्रीलंका व शेसल्स या देशांमध्ये आयोजित योग संमेलनात सहभागी होण्याची संधी मिळाली. मन:शांती देणारे उत्तम साधनयोग हे मन:शांती देणारे उत्तम साधन आहे. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग हे मानवजातीला मिळालेले वरदान आहे. म्हणूनच हा योगदिवस दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हायलाच हवा. संपूर्ण जगात जागतिक योगदिनाच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतातील जवळपास ६५० जिल्ह्यात २१ मे पासून केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे १ महिना कालावधीची योग शिबिरे सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सुरु झाली आहेत.