शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ ७ डिसेंबरला कापूस उत्पादकांची परिषद, गुलाबी बोंडअळीच्या संकटावर काढणार उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:55 IST

अमरावती : गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेल्या संकटाने आता विदर्भ व मराठवाड्यासह मध्य प्रदेश, गुजरात व्यापले.

अमरावती : गुलाबी बोंडअळीचे लगतच्या तेलंगणा राज्यात आलेल्या संकटाने आता विदर्भ व मराठवाड्यासह मध्य प्रदेश, गुजरात व्यापले. दशकात प्रथमच आलेल्या संकटावर मात करून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी यवतमाळ येथे ७ डिसेंबर रोजी कापूस उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन आहे.शेतकरी मिशन, कृषी विभाग, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व त्यांच्याशी जुळलेले महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्व. जवाहरलाल दर्डा सभागृहात एक दिवसीय कार्यशाळा व शेतकरी परिषद आयोजित केली आहे. यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या अभूतपूर्व संकटावर तोडगा व पर्याय काढणे, गुलाबी बोंडअळीचा विषय केंद्रात व राज्यात रेटून शेतक-यांना तात्काळ नुकसानभरपाई मिळावी व गुलाबी बोंडअळीच्या संकटातून कायम सुटका व्हावी, यासाठीचे ठराव व प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येतील.बोंडअळीची समस्या निवारणासाठी परिषदेत शाश्वत शेतीचे अभ्यासक प्रकाश पोहरे, जैविक शेतीचे प्रणेते मनोहरराव परचुरे, केंद्रीय कापूस अनुसंधान परिषदेचे संशोधक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सल्लागार, कृषी विभागाचे अधिकारी मार्गदर्शन करतील, अशी माहिती शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.संकटाचे कारण शोधणारबोंडअळी समस्या निवारणासाठी कापूस उत्पादक कृषी क्षेत्रात कार्य करणा-या सर्व संस्था, शेतकरी, शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते, बियाणे उत्पादकांचे प्रतिनिधी आदी एकाच व्यासपीठावर तोडगा काढणार आहेत. गुलाबी बोंडअळीच्या संकटाचे मूळ कारण, त्यावर चिंतन व तोडगा काढण्यात येणार आहे. शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यशाळेद्वारे प्रयत्न होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी