शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
4
भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
5
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
6
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
7
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
8
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
9
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
10
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
11
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
12
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
13
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
14
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
15
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
16
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
17
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
18
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
19
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
20
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!

 जागतिक शाैचालय दिन; खर्च कोट्यवधी रुपयांचा; उपयोग अडगळ ठेवण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:41 IST

Toilet Day Amravati News मेळघाटातील ग्रामपंचायती अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाची दैनावस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने वेळेपूर्वीच नामशेष होत असून, नागरिक त्याचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठी करीत असल्याचे चित्र आहे.

 नरेंद्र जावरे    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. घर तेथे शौचालय निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च शासनाच्यावतीने केला जात असताना मेळघाटातील ग्रामपंचायती अंतर्गत बांधकाम झालेल्या शौचालयाची दैनावस्था झाली आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने वेळेपूर्वीच नामशेष होत असून, नागरिक त्याचा उपयोग अडगळीचे सामान ठेवण्यासाठी करीत असल्याचे संतापजनक चित्र आहे. जागतिक शौचालय दिनी ही बाब लक्षवेधी ठरावी. 

देशभरातील खेड्यांपासून शहरापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सरपंच ते पंतप्रधानांपर्यंत सर्वांनीच रस्त्यावर उतरून जनजागृती केली. दुसरीकडे ग्रामीण भागात महिलांना उघड्यावर शौचालयासाठी जावे लागत असल्याचे गंभीर चित्र आहे. गावागावांत स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत शौचालय बांधकामाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने होत असताना, मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये मात्र ग्रामपंचायती अंतर्गत शौचालय  बांधकामाचे तीनतेरा वाजले आहेत. तालुक्यातील खडीमल ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम झालेले शौचालय  अर्धवट पडून असल्याचे चित्र आहे. त्यावरील लाखो रुपयांचा खर्च मात्र पूर्ण दाखविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 

संबंधित सचिवांनी बांधकामात संगनमताने मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण ग्रामपंचायती अंतर्गत झालेल्या विविध कामांची सखोल व मुद्देसूद चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकGovernmentसरकार