शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'डीपीसी'तील कोट्यवधींची कामे बांधकाम विभागात मॅनेज ? निविदा उघडण्यासाठी ५८ दिवस का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:02 IST

Amravati : ३० निविदा आल्यानंतरही उघडल्या नाहीत; कामे 'क्लब' करण्याचा डाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा नियोजन समितीने अमरावती महापालिका क्षेत्रातील विविध भागात विकासकामे करण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे. त्याअनुषंगाने ही कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ई-निविदा राबविली असून या कामांसाठी ३० निविदा प्राप्त झाल्या आहेत. मात्र 'बी अॅन्ड सी'चे अधिकारी या निविदा उघडत नसून ही सर्व कामे मॅनेज करण्यासाठी नगरसेवकसुद्धा अधिकाऱ्यांकडे येरझारा मारत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागात जास्त दराने कामे मॅनेज करून देण्याचे जणू षडयंत्र रचले जात असल्याचे दिसून येत आहे.

पालकमंत्री यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी शहराच्या काही भागात विकासकामांसाठी डीपीसीतून निधी मंजूर केला होता. त्याअनुषंगाने ही विकासकामे करण्यासाठीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आला. तसेच ई-निविदा राबविली गेली. या विविध कामांसाठी निविदाधारकांनी निविदांमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र या निविदा उघडल्या नसून त्या-त्या भागातील नगरसेवक आता ही कामे 'क्लब' करून मॅनेज करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संगनमत करीत आहे. या गंभीर प्रकाराला 'बी अॅन्ड सी'च्या अभियंत्यांचीही संमती असून जादा दराने ही कामे कशी देता येईल, याबाबत राजकीय खेळी केली जात आहे.

निविदा उघडण्यासाठी ५८ दिवस का?

जिल्हा नियोजन समितीच्या मंजूर निधीतील कामांची ई-निविदा झाल्यानंतर ती २३ डिसेंबर २०२५ रोजी उघडणे अनिवार्य होते. मात्र, १९ फेब्रुवारी २०२६ उजाळले असताना ५८ दिवसांचा कालावधी झाला आहे. इतका मोठ्या कालावधीनंतरही निविदा उघडण्यासाठी कोणाची वाट बघितली जात आहे. या निविदेत अजून काही नवी खेळी निविदा मॅनेज करण्याचे होत तर नाही ना, असा सूर उमटत आहे. किंबहुना पुन्हा ई-निविदा (रि-टेंडर) करण्याचे मनसुबे तर नाही, अशी चर्चा जोरात सुरू आहे.

२३ कामांसाठी ५९७ निविदाकर्त्यांचा सहभाग

'बी अँड सी'ने अमरावती, बडनेरा भागात करण्यात येणाऱ्या २३ विकासकामांसाठी राबविलेल्या ई-निविदा प्रक्रियेत ५९७निविदाकर्त्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. निविदा प्रक्रिया आरंभ होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला असताना प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही कामे सुरू झालेली नाहीत.

अधिकारी आणि कंत्राटदारात 'फिक्सिंग'

सार्वजनिक बांधकाम विभागात अलीकडे कामे 'क्लब' करून ती मर्जीतील कंत्राटदाराला देण्याचा सपाटा सुरू झाला आहे. 'बी अॅन्ड सी' रोड, नाली, पेव्हिंग ब्लॉक, काँक्रीट रस्ता बांधण्याचे कामे अधिकारी कामे मॅनेज करून देतात. महिनाभरापूर्वी निवडून आलेले नगरसेवकसुद्धा कामे मॅनेज करायला अधिकाऱ्यांकडे चकरा मारताना दिसत आहे. यापूर्वी आमदार, खासदार यांच्या नावाने बोंबाबोंब होती.

मुख्यमंत्री, बांधकाममंत्री लक्ष देतील का?

अमरावतीच्या कठोरा ते रेवसा या दरम्यान २० कोटींच्या निधीतून बांधण्यात आलेल्या रस्त्याचे काम सुद्धा 'बी अॅन्ड सी'ने मॅनेज करून मर्जीतील कंत्राटदाराला सोपविले होते. हा रस्त्याकरिता केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी निधी दिला होता. या रस्ता निर्मितीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपहार केल्याबाबत राज्य शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री लक्ष देतील का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

"'डीपीसी'तील कामे 'क्लब' करण्यासंदर्भात मला काही माहिती नाही. असे असेल तर नक्कीच लक्ष दिले जाईल. मात्र विकासकामांची निविदा प्रक्रियेनुसार कार्यवाही होईल."- प्रतीक गिरी, कार्यकारी अभियंता, 'बी अॅन्ड सी' अमरावती

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati DPC Works: Allegations of Managed Tenders, Delayed Opening

Web Summary : Amravati's DPC-funded works face tender manipulation allegations. Public Works Department delays opening bids, sparking concerns of favoritism and inflated costs. Councilors allegedly collude with officials, raising questions about transparency and potential re-tendering.
टॅग्स :Amravatiअमरावती