शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा दोन महिन्यांत - उपमुख्यमंत्री फडणवीस

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 10, 2023 18:03 IST

१५ दिवसांमध्ये समिती स्थापन, उपलब्ध कक्षात कामकाज सुरू करणार

अमरावती : रिद्धपूर येथे स्थापना करण्यात येणाऱ्या मराठी भाषा विद्यापीठाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी १५ दिवसांत समिती स्थापन करण्यात येईल. यामध्ये एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश करण्यात येईल. दोन महिन्यांत विद्यापीठाची कार्यकक्षा निश्चित होणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली.

मराठी भाषा विद्यापीठ संदर्भात येथील नियोजन भवनात आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये उच्च व तंत्र विभागाचे प्रधान सचिव विकासचंद रस्तोगी ऑनलाइन सहभागी झाले होते. रिद्धपूर येथे थीम पार्कमध्ये सभागृह, कक्ष उपलब्ध आहेत. तिथे तत्काळ विद्यापीठाचे आवश्यक ते काम सुरू करावे. या ठिकाणी अनेक अभ्यासक्रम मराठीत सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी या विद्यापीठाचा उपयोग होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विद्यापीठाला स्वरूप कसे देता येता येईल, यासाठी ही समिती असेल. यासंदर्भातील फाईल लगेच पाठवित असल्याचे रस्तोगी म्हणाले. साधारणपणे १५ दिवसांमध्ये याबाबतचा शासन निर्णय निघेल. हे मराठी भाषा विद्यापीठ पब्लिक युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट फायनान्स या स्वरूपाचे राहणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात फडणवीस यांनी रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने त्यांनी सोमवारी याबाबत नियोजन भवनात आढावा घेतला. बैठकीपश्चात त्यांनी रिद्धपूरला भेट दिली. त्यांनी श्री गोविंद प्रभू राजमठ येथे दर्शन घेतले. मठातर्फे मोहनराज बाबा कारंजेकर यांनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :Educationशिक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसuniversityविद्यापीठ