रणजित पाटील : नगरविकास दिन उत्साहात अंजनगाव सुर्जी : इतर नगरपालिकांच्या तुलनेत विकासाच्या दृष्टिने अंजनगाव सुर्जी नगरपरिषद माघारली होती. विकासाच्या मुद्यावरच एकहाती सत्ता मिळाली. त्यामुळे आता जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कठोर परिश्रम घ्यावेत, पालिकेला निधीची कमतरता पडू देणार नाही, असे मनोगत राज्याचे गृह-नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी व्यक्त केले. स्थानिक नगरपरिषद सभागृहात आयोजित नगरविकास दिनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आ. रमेश बुंदिले, मुख्याधिकारी संदीप बोरकर, रमेश जायदे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य रवींद्र कोकाटे, उपाध्यक्ष दीपाली पवार, नगरसेवक नियाज कुरेशी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे होते. सुरूवातीला रणजित पाटील, रमेश बुंदिले यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक बोरकर, संचालन संजय गुलवाडे व आभार प्रदर्शन भुपेंद्र भेलांडे यांनी केले.
जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी कठोर परिश्रम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2017 00:17 IST