शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राज्यातील अंगणवाड्यांचे काम मेपासून होणार पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:10 AM

पेपरलेस कामकाजाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या राज्य शासनाच्या अंगणवाडी सेविकांना आता सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आॅनलाइन भरावा लागणार आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांकडे आले मोबाइल सर्व अहवालही आॅनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पेपरलेस कामकाजाच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या राज्य शासनाच्या अंगणवाडी सेविकांना आता सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आॅनलाइन भरावा लागणार आहे. त्यासाठी शासनाने मोबाइल संच उपलब्ध केले आहेत. मेपासून अंगणवाड्यांचे काम पेपरलेस होण्याचा विश्वास व्यक्त होत आहे.बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांची यासंदर्भात कार्यशाळा घेण्यात येत आहे. यानंतर अंगणवाडी सेविकांना एप्रिल महिन्याअखेरीस प्रशिक्षण दिले जाईल. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने विकसित केलेल्या मोबाइल अ‍ॅपद्वारे कामकाज करण्यात येणार आहे. याबाबत सर्व स्तरांवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १ मेपासून अंगणवाड्यांतील कामकाज पेपरलेस करण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले असून, रजिस्टरऐवजी मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्ट फोनमध्येच लसीकरण व गृहभेटीच्या दैनंदिन नोंदी व बालकांच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जातील. जिल्ह्यात याचा वापर प्रभावीपणे करून जबाबदारीने काम करण्याचे निर्देश महिला व बाल कल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ यांनी दिले आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने सदर मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे.पूरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे, गरोदर माता-बालकांचे वजन, लसीकरण यांसह इतर बाबींची कामे असतात. या सर्व कामांचा अहवाल अंगणवाडी सेविकांना केंद्र वा तालुका स्तरावर द्यावा लागत असतो. दुर्गम भागात रस्त्यांची व वाहनांची कमरता लक्षात घेता, असे अहवाल वेळेत सादर करण्यासाठी मोठी कसरत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना करावी लागत होती. आता या माहितीचे तालुकास्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत बघता येणार आहे.अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांचे कामकाज गतिमान होण्यासाठी शासनाने मोबाइल देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना मोबाइल देण्यात आले आहेत. आता दैनंदिन कामकाज आॅनलाईन होणार आहे.- प्रशांत थोरात, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, अमरावती.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र