शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

३५ हजार मजुरांना काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर बड्या शहरासह परराज्यात कामाच्या शोधात भटकंती करतात. दुसरीकडे मेळघाटात मग्रारोहयोच्या कामावर हजारो मजुरांची उपस्थिती असते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊननंतर पूर्णत: कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब आदिवासींची फरपट झाली.

ठळक मुद्देविविध कामांना प्रारंभ : पालकमंत्र्यांचे आदेश; आदिवासी सरसावले

नरेंद्र जावरे। लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा/परतवाडा : मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यामध्ये आठ दिवसांत मग्रारोहयो अंतर्गत विविध कामांना सुरुवात झाली आहे. चिखलदरा तालुक्यात २५ हजार, तर धारणी तालुक्यात १० हजार अशी एकूण ३५ हजार मजुरांची उपस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात मजुरांच्या हाताला काम देऊन आदिवासींचा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला यश येत आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करीत अधिकाधिक रोजगार उपलब्ध केला जात आहे. जिल्ह्यात एकूण ४५ हजारांपैकी तब्बल ३५ हजार मजूर मेळघाटात कार्यरत आहेत.दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर बड्या शहरासह परराज्यात कामाच्या शोधात भटकंती करतात. दुसरीकडे मेळघाटात मग्रारोहयोच्या कामावर हजारो मजुरांची उपस्थिती असते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊननंतर पूर्णत: कामे बंद करण्यात आली होती. त्यामुळे हातावर पोट असलेल्या गोरगरीब आदिवासींची फरपट झाली. यामुळे मग्रारोहयोची कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश महिला बाल विकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानंतर प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंगवर भर देत ग्रामपंचायत लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, वनविभाग, कृषी विभाग अशा विविध यंत्रणांमार्फत मग्रारोहयो अंतर्गत कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये सलग समपातळी चर खोदणे, दगडी बांध, घरकुल, वृक्षलागवड, सार्वजनिक विहिरी, गावतलावाचा गाळ काढणे, सिंचन विहिरी अशी विविध कामे उघडण्यात आल्याची माहिती चिखलदऱ्यात  ७४४ कामे तहसीलदार माया माने यांनी ‘लोकमत’ला दिली. धारणी तालुक्यात ३०७ कामे सुरू असल्याचे तहसीलदार अतुल पडोळे यांनी सांगितले.आठ दिवसांत हजारो हातांना कामपालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यात मग्रारोहयो अंतर्गत विविध कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिल्यावर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी महसूल प्रशासनाला तसे आदेश दिले होते. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी याबाबत मागणी  केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी, चिखलदºयाच्या तहसीलदार माया माने, खंडविकास अधिकारी प्रकाश पोळ, धारणीचे तहसीलदार अतुल पडोळे, खंडविकास अधिकारी महेश पाटील यांनी आढावा घेतला. त्यानंतर ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता दीपेंद्र कोराटे, लघुसिंचन विभागाचे ललित सोनोने, शिरीष तट्टे तसेच कृषी, वन विभाग आदी यंत्रणांमार्फत ही कामे सुरू आहे. काही विभागांनी नियोजन केले आहे. ग्रामपंचायती अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू करण्यात आली आहेत. जवळपास ७४४ कामांवर २५ हजार मजुरांना सद्यस्थितीत आठ दिवसांत कामे उपलब्ध करून दिली आहेत. - प्रकाश पोळ,गटविकास अधिकारी, चिखलदराधारणी तालुक्यात ३०७ कामांवर १० हजार मजूर मग्रारोहयो अंतर्गत कार्यरत आहेत. इतर यंत्रणांमार्फत जास्तीत जास्त कामे उघडण्यात येत आहेत.- अतुल पाटोळेतहसीलदार, धारणी

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीTahasildarतहसीलदार