शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ कार्यालयावर धडकल्या महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:17 IST

अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसाही चोऱ्या, लूटपाट, महिला-मुलींची छेड काढणे, अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. हे रोखण्यासाठी शहर रात्री ११ नंतर बंद करा. पंधरा दिवसांत या सर्व बाबींची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध महिला संघटनांनी शुक्रवारी उपविभागीय अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला. याप्रसंगी पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

ठळक मुद्देइशारा : शहर रात्री ११ नंतर बंद; अवैध धंदे बंदची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. दिवसाही चोऱ्या, लूटपाट, महिला-मुलींची छेड काढणे, अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. हे रोखण्यासाठी शहर रात्री ११ नंतर बंद करा. पंधरा दिवसांत या सर्व बाबींची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध महिला संघटनांनी शुक्रवारी उपविभागीय अधिकाºयांना निवेदनाद्वारे दिला. याप्रसंगी पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.शहरात मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी हैदोस घातला आहे. महिलांना घराबाहेर एकटे पडणे मुश्कील झाले आहे. सोनसाखळी मंगळसूत्र पळवून नेण्याच्या घटना वाढल्या असून, चोरटे दिवसाही घरांना निशाणा बनवित आहेत. मुलींसह महिलांची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहे. सात-आठ महिन्यांपासून महिलांमध्ये दहशत पसरली असून बाहेर निघणे कठीण झाले. चौकाचौकांत असामाजिक तत्त्व नाहक त्रास देतात. धूम स्टाइलने दुचाकी चालविणे, तोंडाला रुमाल बांधून मंगळसूत्र हिसकावून पळ काढणे आता नित्याची बाब झाली आहे. सबब, १५ दिवसांत कारवाई करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदन देताना अपर्णा देशमुख, सीमा थोरात, माजी नगराध्यक्ष संगीता वैद्य, सोनाली पाटील, नगरसेविका किरण मालू, अक्षरा लहाने, रीना जयस्वाल, अपर्णा रोडे, किरण ठाकरे, मीनाक्षी मालू, सुनीता शेळके, ज्योत्स्ना देशमुख, विद्या शेळके, विभा बूब, सुनंदा गुडदे, मुक्ता पाटील, संगीता नरेडी, ममता अग्रवाल, सविता शहा, नीलिमा मुळे, प्रीती ठाकरे, दीपाली विधळे, किरण चव्हाण, स्वाती विधळे, तारकेश्वरी चिखले, सुशीला कडू, छाया पांडे, अश्विनी वाडेगावकर, मंगला लड्डा, भारती राऊत, कुसुम राऊत, भारती गुजर, छाया अग्रवाल, ज्योती राठी, साक्षी बरडिया आदींसह महिलाशक्ती होती.हे करा उपाय; महिला संघटनांचा सल्लाजुळ्या शहरात किती आॅटोरिक्षा आहेत, कितींना परवानगी आहे, याची तपासणी करा. आॅटोरिक्षाचालकांना ड्रेसकोड द्या. पीयूसीची तपासणी करा. अचलपुरातील डॉ.राठी ते बसस्थानक मार्गावरील वाहनांवर कारवाई करा. शहरात सीसीटीव्ही कॅमेरा, ज्या नागरिकांनी स्वत:चे सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, त्यांना एक कॅमेरा रस्त्याच्या बाजूने लावण्यास विनंती करा. शहरातील स्पीड ब्रेकरची संख्या वाढवा.अशा मागणी वजा सल्ला देण्यात आला.