श्यामकांत पाण्डेय धारणीविशिष्ट समाजातील युवकांनी युवतींना लग्नाचे आमिष दाखवून प्रेमजाळ्यात फसविण्याचा प्रकार हेतुपुरस्सरपणे सुरु केल्याची उदाहरणे समोर येत आहेत. यामुळे जागरूक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. आतापर्यंत केवळ शहरांपुरतेच मर्यादित असलेले हे लोण हल्ली ग्रामीण भागातही पसरू लागल्याची उदाहरणे आहेत. सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेऊन तरूणींची दिशाभूल करून नंतर त्यांची प्रतारणा करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असल्याने पालकांसह तरूणींनीही जागरूकता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. आवडत्या व्यक्तिसोबत आयुष्यभर राहण्यासाठी आता शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील तरूणीदेखील पळून जाण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. विशिष्ट समुदायातील तरुण मुले शाळकरी, महाविद्यालयीन तरुणींना हेरुन त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करतात. विवाहदेखील करतात. त्यानंतर मुलींना वाऱ्यावर सोडून पळ काढतात. धर्मप्रसारासाठी हा प्रकार सर्रास सुरू असल्याच्या मुद्यावरून परिसरात गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अन्य धर्माच्या मुलींना फसविण्यासाठी अशा युवकांना पैशांच्या स्वरुपात मोबदला मिळत असल्याचे आरोप आता उघडपणे होत आहे. अशा प्रकरणातील तरुणांचे राहणीमान शंका उत्पन्न करणारे आहे. लग्न झाल्यानंतर पालकही हतबल ठरतात. त्यामुळे मुलींनीच जागरूकता बाळगून भविष्याबद्दल योग्य निर्णय घेण्याची गरज जागरूक नागरिक व्यक्त करीत आहेत. ग्रामीण परिसरात यादृष्टीने कुठली प्रभावी यंत्रणा उभारता येईल यावर मंथन सुरू आहे.
युवतींनो सावधान : फसू नका, प्रेमजाळ्याचे लोण ग्रामीण भागातही !
By admin | Updated: March 14, 2015 00:36 IST