अमरावती : मालमत्तेच्या जुन्या वादातून एका महिलेच्या घरात शिरून तिचा गळा आवळण्यात आला. तर तिच्या नातीचा विनयभंग करून तिची छेड काढण्यात आली. १० सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास छायानगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून बिस्मिला खान वल्द गफूरखान (४४, छायानगर), मो. मोहिबुद्दीन ऊर्फ सोनू नसोरोद्दीन (३०, रा. आर्वी), मयूरसिंग चव्हाण (३०, पुंडलिकबाबानगर) व अ. नसीम अ. रजाक (३५, रा. पठाणचौक) यांच्याविरुद्ध अश्लील शिवीगाळ, विनयभंग व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, मालमत्तेच्या वादातून चारही आरोपी १० सप्टेंबर रोजी फिर्यादी महिलेच्या घरामोर येऊन फलक लावू लागले. विचारणा केली असता, चौघांनीही त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सुनेला ढकलण्यात आली. नात वाचविण्यासाठी आली असता, आरोपी बिस्मिल्ला खान व अ. नसीम या दोघांनी तिचा विनयभंग केला. मयूरसिंहने तिला ओढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या चारही आरोपींनी अल्पवयीन मुलीला तुझ्या पित्याला समजावून सांग, अशी धमकी दिली व पलायन केले. याबाबत १० सप्टेंबर रोजी रात्री १०.३९ च्या सुमारास तक्रार नोंदविण्यात आली.