शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष देऊन महिलेवर शेगाव, अमरावतीत अत्याचार

By प्रदीप भाकरे | Updated: April 4, 2023 17:22 IST

लग्नास नकार, बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

अमरावती : लग्नाचे आमिष देऊन एका महिलेवर प्रथम शेगाव व त्यानंतर अमरावतीत वारंवार अत्याचार करण्यात आला. मात्र त्यानंतर त्याने ‘तो मी नव्हेच’ चा पवित्रा घेत लग्नास नकार दिला. १८ डिसेंबर २०२२ ते ४ मार्चदरम्यान ती अत्याचाराची मालिका चालली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी ३ एप्रिल रोजी रात्री आरोपी लोकेश रामकृष्ण रताळे (३३, रा. द्वारकानगर, अमरावती) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, एका ३२ वर्षीय महिलेचे सन २०१७ मध्ये लग्न झाले. मात्र, पतीचे दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे कळल्यावर तिेने घटस्फोटासाठी न्यायालयात धाव घेतली. प्रकरण दाखल केले. दरम्यानच्या काळात लग्नापूर्वी प्रेमसंबंध असलेला लोकेश हा पुन्हा त्या महिलेच्या जीवनात आला. त्याने तिला आपण लग्नासाठी तयार असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला.

१८ डिसेंबर २०२२ रोजी लोकेशने महिलेच्या मोबाइलवर कॉल करून आपण शेगाव येथे देवदर्शनासाठी जाऊया, असे म्हटले. त्यास महिलेने होकार दिल्यावर दोघेही शेगावला गेले. तेथील एका लॉजवर लोकेशने त्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. त्यानंतर लोकेशने त्याच्या घरी कुणी नसताना पीडित महिलेला अनेकदा बोलावून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडिताने लोकेशकडे लग्नाची मागणी केली. त्यावर लोकेशने टाळाटाळ चालविली. लोकेशन लग्न करणार नसल्याचे लक्षात आल्यावर पीडित महिलेने बडनेरा ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी लोकेशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती