शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती : पूर्व वैमनस्यातून महिलेची हत्या, 13 दिवसांनंतर आरोपी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 15:19 IST

अमरावतीतील सातेगाव येथे 13 दिवसांपूर्वी अनसुया शिवलाल महाजन या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मंगेश गजाननं इंगळे (वय 19 वर्ष) या तरुणास अटक करण्यात आली आहे.

अंजनगाव सुर्जी (अमरावती) :  सातेगाव येथे 13 दिवसांपूर्वी अनसुया शिवलाल महाजन या महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मंगेश गजाननं इंगळे (वय 19 वर्ष) या तरुणास अटक करण्यात आली आहे. शेतातील धु-याचा व लघुशंका करण्याच्या वादातून त्याने अनसुया यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी रहिमापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संशयितांची कसून चौकशी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी ३०२ व २०१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.  रहिमापूर पोलीस ठाण्यांतर्गत सातेगाव शेत शिवारात कापूस वेचायला गेलेल्या अनसुया शिवलाल महाजन यांचा मृतदेह 1 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास जवळच्या शेतातील विहिरीत आढळला होता. गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अनेकांवर संशय असल्याने पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली होती. दुसरीकडे अनेक दिवस होऊनही आरोपीचा शोध लागत नसल्याने रहिमापूर पोलिसांवर दबाव वाढला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनसुया महाजन हिच्या हत्येमागे शेतातील धु-याचा व लघुशंकेचा वाद कारणीभूत आहे. काही दिवसांपूर्वी मृत महिलेचा पती शिवलाल महाजन व आरोपीचे वडील गजानन इंगळे यांच्यात धु-याचा वाद नेहमीचाच झाला होता. आरोपी मंगेश व मृत अनसुया हिच्यासोबतही यावरून भांडण झाले होते. तसंच अनसुया महाजन शेतकाम करीत असताना त्यांच्या पाण्याच्या डबकीत लघुशंका करत असल्याचा आरोप महाजन यांच्याकडून करण्यात आला होता, यावरूनही वाद होत असत. 1 नोव्हेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान गुरे चरत असताना त्याच्यासोबत असलेल्या दोघांना शेतातील स्प्रिंकलरची शिप बदलून येतो, असे सांगितले व निघून गेला. शेतात जात असताना अनसुया एकटीच कापूस वेचताना दिसल्याने तिच्या जवळ जाऊन मी लघुशंका केली नाही असे म्हणत त्यानं वाद घातला. वादाचे रुपांतर भांडणात झाले. या झटापटीत तिच्या गळ्यात असलेली कापसाची खंदाळीचा फास लागला व ती मृत्यू झाला. त्यानंतर भीतीपोटी अनसुया महाजन यांचा मृतदेह बाजूच्या शेतातील कोरड्या विहिरीत फेकला व पळ काढला. 

या प्रकरणाचा तपास अंजनगाव सुर्जीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, रहिमापूरचे ठाणेदार सचिन शिरसाट, सहायक उपनिरीक्षक गजानन रहाटे, सचिन भोसले, रमेश गोरले, सुधाकर चव्हाण, चंद्रकांत खंदार, प्रफुल रायबोले, विलास पटोकार, निलेश तोटे यांनी केला.  आरोपीला व्हायचे होते पोलीसआरोपी मंगेश हा मागील काही दिवसापासून पोलीस भरती  तसेच शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. आरोपीचे वडील रहिमापूर ठाण्यात होमर्गाड असल्यामुळे पोलीस होण्याकडे त्याचा जादा कल होता. 

या गुह्यात आरोपीजवळ डिजिटल यंत्र नसल्याने किंवा मोबाइल वापरला नसल्यामुळे आरोपी शोधणे कठीण झाले होते. पोलिसांनी त्या दिवशीचे सॅटेलाईट इमेजचा वापर केला. महाजन यांच्या शेताच्या आजूबाजूच्या शेतात होणा-या घडामोडींची पाहणी केली आहे. या माहितीवरून आरोपीस अटक  केली. विचारपूस केल्यावर  तो फुटला. - सुनील जायभाय, उपविभागीय पोलीस अधिकारी, अंजनगाव

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा