शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पालकांना ‘आय एम सॉरी’चा मॅसेज अन् फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरीलाच ‘ती’ झुलली फासावर

By प्रदीप भाकरे | Updated: November 23, 2022 13:42 IST

गणेशननगर येथे नवविवाहितेची आत्महत्या

अमरावती : तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असल्याने अगदी पुर्वसंध्येपासूनच तिच्या मोबाईलवर ‘हॅपी मॅरेज ॲनिव्हर्सरीचे मॅसेज धडकू लागले. ती मनोमन आनंदली. पती, पत्नी दोघेही चिखलदऱ्याला गेले. तेथे तिने पतीला एक दिवस आणखी थांबू, असे म्हटले. मात्र पतीने भांडण करून तिला सायंकाळी घरी परत आणले. त्यानंतर काहीच वेळात तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. २१ नोव्हेंबरची फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी तिच्या आत्महत्येने ‘डेथ ॲनिव्हर्सरी’मध्ये बदलली. मृत्यूपूर्वी तिने वडिलांना ‘आय एम सॉरी’ असा मॅसेज देखील टाकला.

स्नेहल गोविंद सावध (रा. गणेशनगर, देशमुख लॉन परिसर, अमरावती) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी मृताचा पती गोविंद प्रकाशराव सावध, दिर आशिष प्रकाशराव सावध व एका महिलेविरुद्ध कौटुंबिक छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मृत विवाहितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, स्नेहल व गोविंद यांचा २१ नोव्हेंबर २०२१ ला विवाह झाला होता. त्यानंतर गोविंद व त्याच्या कुटुंबातील सदस्य तिला त्रास देत होते. माहेराहून १ लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावून तिचा अनन्वित मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. दरम्यान, २१ नोव्हेंबर रोजी लग्नाचा पहिला वाढदिवस असल्यामुळे स्नेहल व गोविंद दोघेही चिखलदरा गेले. आणखी एक दिवस चिखलदरा थांबू, असे मुलीने पती गोविंदला म्हटले. मात्र त्याने वाद घालून स्नेहलला अमरावतीत परत आणले. दरम्यान सोमवारी सायंकाळी ७.३० ते ७.४५ दरम्यान स्नेहलने गळफास घेऊन आत्महत्या केली.

असा आहे आरोप

तक्रारीनुसार, पती व सासरच्या मंडळींनी १ लाख रुपयांची मागणी करून स्नेहलचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. त्या त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मृतक मुलीच्या वडिलांनी दिली आहे. दरम्यान आत्महत्येपुर्वी सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांच्या स्नेहलने वडिलांना ‘खूप मानसिक त्रास होत आहे पप्पा येथे सर्वांना, आय ॲम सॉरी’ असा मेसेज केला होता. मात्र कामात असल्याने तिचे वडिल तो मॅसेज पाहू शकले नाहीत. त्यांनी तो मॅसेज उशिराने वाचला. तोपर्यंत ती फासावर झुलली होती. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारDeathमृत्यूAmravatiअमरावती