शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

पती घरी नाही सांगूनही जबरदस्ती घरात घुसला, तिने चपलेचा प्रसाद देताच काढला पळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 16:42 IST

केवळ प्रसंगावधान राखल्याने त्या महिलेसोबत होणारा विपरीत प्रसंग टळला.

ठळक मुद्देस्वसंरक्षण : विनयभंग, पतीला मारहाण

अमरावती : पती घरी नाही, असे सांगितल्यावरही तो तिच्या घरात शिरला. तिला जवळ ओढले. काही तरी विपरीत घडत असल्याचे लक्षात येताच ती क्षणात सावरली अन् त्याच्यामागे चप्पल घेऊन धावली. आता आपले काही खरे नाही, या भीतीपोटी तोही तेथून रफुचक्कर झाला. केवळ प्रसंगावधान राखल्याने त्या महिलेसोबत होणारा विपरीत प्रसंग टळला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात १९ एप्रिल रोजी सकाळी ११ ते ११.४५ च्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी राहुल प्रकाश मोहिते (२६) व चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. संबंधित महिला ही घरी जेवण तयार करीत असताना आरोपी राहुल मोहिते हा तिच्या घरी आला. तिच्या पतीचे नाव घेत तो घरी आहे का, अशी विचारणा केली. त्यावर तिने ‘ते’ घरी नसल्याचे सांगितले. तरीही मोहिते तिच्या घरात शिरला. एकाने पैसे दिले का, त्याने हो म्हटले, म्हणून मी आलो, अशी बतावणी करून त्याने तिचा विनयभंग केला. मात्र, तिने प्रसंगावधान राखत त्याच्या हाताला झटका देत त्याला बाजूला सारले. घरातील चप्पल घेऊन ती त्याला मारण्यास गेली असता तो पळून गेला.

दरम्यान, एका शेजाऱ्याने तिच्या पतीला ती माहिती दिल्याने तोदेखील घरी पोहोचला. ती आपबीती कथन करीत असतानाच आरोपीशी संबंधित असलेल्या चार महिला तिच्या घरी आल्या. तिच्याशी वाद केला. त्यात तिच्या दोन्ही हातांना मार लागला. चारही महिलांनी महिलेच्या पतीसोबतही वाद घातला. त्यामुळे महिलेने तातडीने नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी १९ एप्रिल रोजी दुपारी ३ च्या सुमारास गुन्ह्याची नोंद केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी