शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कारागृहे की कोंडवाडे? मंत्री, आमदार अबोल...

By गणेश वासनिक | Updated: December 30, 2022 17:53 IST

मंत्री, आमदार, खासदारांची जेलवारी : हिवाळी अधिवेशन आटोपले, कारागृहे कैद्यांनी 'ओव्हर फ्लो'

अमरावती : राज्य विधिमंडळाचे नागपूर हिवाळी अधिवेशनाचे शुक्रवारी सूप वाजले. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रश्न, समस्यांवर मंथन झाले. मात्र, राज्यात कारागृहांमध्ये कैद्यांची वाढती संख्या आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कारागृहे हे कोंडवाडे झाले असताना यासंदर्भात मंत्री, आमदार अबोल असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सर्वोच्च व उच्च न्यायालयाकडून कैद्यांना बहाल करण्यात आलेल्या मानवी हक्काची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाने केली होती. त्याअनुषंगाने कारागृहात मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे राज्याचे मध्यवर्ती कारागृहे, जिल्हा कारागृहे, असो वा महिला कारागृह यातील रिक्त पदे दोन महिन्यांत भरती करून तसा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. मात्र, आठ महिन्यांच्या कालावधीनंतरही कोणत्याच हालचाली झाल्या नाही. किंबहुना हिवाळी अधिवेशनात कारागृहांच्या रिक्त पदांविषयी निर्णय हाेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गृह मंत्रालयदेखील कारागृहांच्या समस्यांबाबत फारसे गंभीर नसल्याचे हे वास्तव आहे.गृहमंत्र्यांकडूनही दुर्लक्षित

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरात झाले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरातीलच आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनात एकट्या विदर्भात ६० टक्के जागा रिक्त असल्यामुळे किमान हा मुद्दा अधिवेशनात उचलल्या जाईल आणि तो मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु, कारागृहात कैद्यांची गर्दी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांबाबत ना तारांकित, ना लक्षवेधी दिसून आली. एवढेच नव्हे तर गृहमंत्री फडणवीस घांच्या नोंदी सुद्धा कारागृह प्रशसन दुर्लक्षि होते, हे विशेष.मंत्री, आमदार, खासदारांनी अनुभवले कारागृहाचे वास्तव

गत काही महिन्यांपूर्वी ईडी, सीबीआय अथवा पोलिस कारवाईनंतर राज्याचे काही मंत्री, आमदार, खासदार हे वेगवेगळ्या कारागृहांमध्ये जेलवारी करून आले. कारागृहांमध्ये कैद्यांची गर्दी आणि रिक्त पदांमुळे निर्माण झालेली अस्थिरता लोकप्रतिनिधींनी जवळून अनुभवली आहे. यात शिवसेनेचे नेते तथा राज्यसभा सदस्य संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, छगन भुजबळ हे मुंबई येथील आर्थर रोड कारागृहात, खासदार नवनीत राणा या भायखळा तर आमदार रवि राणा हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त होते.दोन वर्षात साडेआठ हजार कैदी वाढले

मध्यवर्ती कारागृहे कैद्यांनी हाऊसफुल्ल, कोरोनानंतर गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढले. कोरोनानंतर गत दोन वर्षात साडेआठ हजार कैदी वाढल्याची धक्कादायक माहिती आहे. नऊ पैकी सात मध्यवर्ती कारागृहात अधीक्षक नाही. तुरूंगाधिकाऱ्यांची १०० पदे रिक्त असून, ३५० शिपाई, १५ उपअधीक्षक, १० अधीक्षक असा पदांचा अनुशेष आहे. आजमितीला कारागृहांमध्ये ४२ हजार ५०० कैदी बंदीस्त आहेत.

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंग