शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

इन्कम टॅक्स भरणाऱ्या बहिणींना नाही मिळणार लाडक्या बहीण योजनेचा लाभ? बहिणी शासनाच्या 'रडार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:01 IST

Amravati : जिल्ह्यात ६ लाख २७ हजारांवर लाभार्थी महिला, केवळ ४५ महिलांना लाभनाकारला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राबविली जात आहे. मात्र, काही आर्थिक सक्षम महिलासुध्दा या योजनेचा लाभ घेत असल्याचा संशय शासनाला आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणींची शोधमोहीम सुरू होणार आहे. 

काही दिवसांपूर्वी राज्यातील शासकीय कर्मचारी असलेल्या दोन हजार महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अशा लाभार्थ्यांची नावे आता कमी केली आहेत. अशातच आता राज्यासह जिल्ह्यातही इन्कम टॅक्स भरणाऱ्या लाडक्या बहिणींची शोधमोहीम सुरू होणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांची नावे आहेत का? याची पडताळणी केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास १ जुलै २०२४पासून सुरुवात झाली. जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत लाभार्थीचे अर्ज स्वीकारले होते. महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आर्थिकरीत्या सक्षम असणाऱ्या महिलांची नावे वगळण्यास सुरुवात केली. मार्च २०२५ महिन्यात संजय गांधी निराधार, श्रवणबाळ योजना लाभार्थी यांची नावे कमी केली आहेत. 

त्या' बहिणींचा डेटा देण्यास परवानगीकेंद्र सरकारने एका अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बालविकास सचिवांना आयकर भरणाऱ्या महिलांचा डेटा देण्यासाठी परवानगी दिली आहे. ही अधिसूचना ३ जून २०२५ रोजी केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या सचिव जया प्रकाश यांच्या मान्यतेने काढली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभदेण्यासाठी आणि आयकर भरणाऱ्या महिलांना वगळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या अर्थ खात्याकडे परवानगी मागितली होती. यास केंद्राने मंजुरी दिली.

टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAmravatiअमरावती