शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
5
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
6
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
7
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
8
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
9
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
10
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
11
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
12
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
13
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
14
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
15
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
16
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
17
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

एका वाघनखाच्या शोधात वनाधिकारी, वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 5:48 PM

पूर्वमेळघाट वनविभागाचे वनअधिकारी वाघाच्या एका नखाच्या शोधात असून, यात सात आरोपींव्यतिरिक्त दोन बडे मासे अडकणार असल्याची माहिती हाती लागली आहे

- अनिल कडूपरतवाडा (अमरावती) : पूर्वमेळघाट वनविभागाचे वनअधिकारी वाघाच्या एका नखाच्या शोधात असून, यात सात आरोपींव्यतिरिक्त दोन बडे मासे अडकणार असल्याची माहिती हाती लागली आहे.या वाघनखं, दात प्रकरणात वनअधिकाºयांनी आरोपींकडून मोराचा पाय, सायळचे काटे, खवल्या मांजराची खवली, वाघाची हाड आणि घोरपड व अजगर सापाच्या चरबीपासून बनवलेले तेल जप्त केले आहे. वाघाप्रमाणेच हे सर्व प्राणी शेड्यूल वनमध्ये येतात. यात वाघाची हाडे गावच्या पोलीस पाटलाकडून ताब्यात घेण्यात आली आहेत. वाघाची एकूण आठ नखे, तीन दात वनविभागाने हस्तगत केली असली तरी एका नखाच्या शोधात वनाधिकारी आहेत. आरोपींनी नऊ वाघनखांची कबुली दिली आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या बंदरकहू कॅम्पवरील दोन चौकीदारांना अटक करण्यात आली आहे. व्याघ्र प्रकल्पांतर्गत अतिसंवेदनशील क्षेत्रातील ही घटना असली तरी संबंधित वाघ मेल्याची, गायब झाल्याची माहिती व्याघ्र प्रकल्पाकडे नाही. वन कर्मचाºयांच्या गस्ती अहवालात तसा उल्लेख नाही. याबाबत कुठेही वनगुन्ह्याची नोंद नाही. यामुळे वनकर्मचाºयांचे गस्ती अहवाल आणि वनाधिकाºयांचा टूर डायºया संशयास्पद ठरत आहेत. वाघ मरतात, कुजतातव्याघ्र प्रकल्पासह प्रादेशिक वनपरिक्षेत्रात वाघ मरतात, मारल्या जातात, सडतात, कुजतात याची माहिती बरेचदा वनअधिकाºयांना नसते. दफ्तरी त्याची नोंदही मिळत नाही. माहिती मिळालीच तर ती आठ ते दहा दिवसांनी किंवा दहा ते पंधरा दिवसांनी मिळते आणि मग नाकाला रूमाल लावून त्याचा पंचनामा उरकविल्या जातो. ओढताढ करीत त्याच्या अंगावर लाकडं टाकून मग जाळल्या जाते. हे मेळघाटच्या वाघाचे दुर्दैव्य. जंगलाच्या राजाच्या राजाला मेल्यानंतर ना सलामी ना काही.समन्वयाचा अभाव, सीबीआयकडे तपासमेळघाटात एकामागून एक वाघ मरत आहेत. मारल्या जात आहेत. याचा उलगडाही होत आहे. पण यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व प्रादेशिक वनविभागाचे कर्मचारी, अधिकारी यांच्यात समन्वय नाही. चौकशीत एकमेकाला सहकार्य नाही आणि तेही आपसात मदत घेत नाहीत. दरम्यान, या घटनांची सीबीआयमार्फत चौकशी केली जावी, असे मत व्यक्त होत आहे. हम भी आपसे कम नहींपूर्व मेळघाट वनविभागांतर्गंत अंजनगाव वनपरिक्षेत्रातील गिरगुटी परिसरात पाचपेक्षा अधिक वाघ मारल्या गेलेत. याची जाणीव व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांनी पूर्व मेळघाट वनविभागाला करून दिली. या अनुषंगाने दीड महिन्यांपासून पूर्व मेळघाट वनविभागाचे अधिकारी तपास करीत आहेत. पण, गिरगुटी प्रकरणात त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. दरम्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेलेल्या वाघाची वाघनखं, दात, हाडे जप्त करून आरोपींना अटक करून पूर्व मेळघाट वनविभागाने ‘हम भी आपसे कम नहीं’ हे व्याघ्र प्रकल्पाला दाखवून दिले. यात आपल्याकडेही वाघ मरतात. पण, आपल्यालाही त्याची माहिती नसते याची जाणीव पूर्व मेळघाट वनविभागाने व्याघ्र प्रकल्प अधिकाºयांना करून दिली.

२००५ मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान असताना राजस्थानमधील सरीस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची चौकशी सीबीआयकडे दिली होती. २००९ मध्येही भंडारा, चंद्रपूर कडील वाघांच्या शिकारींची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली होती. तर वाघाला प्रत्येक पायाला चार असे एकूण १६ मोठी नखे असतात. प्रत्येक पायाच्या अंगठ्यालगतचे नख लहान असते.- जयंत वडतकर,मानद वन्यजीव रक्षक, अमरावती

टॅग्स :TigerवाघAmravatiअमरावती