शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पतीने गळफास घेतल्याचे कळताच पत्नीने घेतले विष; अमरावती जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 11:30 IST

पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच माहेरी असलेल्या पत्नीनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घडली.

ठळक मुद्देशिवणी-येणस गावांत खळबळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धक्कादायक घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच माहेरी असलेल्या पत्नीनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घडली. मयूर रमेश मरगडे (२५) व पूनम मयूर मरगडे (२२, दोन्ही रा. शिवणी रसुलापूर) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.शिवणी रसुलापूर येथील रहिवासी मयूर मरगडेचे येणस गावातील पूनमशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला. दोघेही शिवणीत राहत होते. बुधवारी मरगडे दाम्पत्य रक्षाबंधन कार्यक्रमासाठी येणस गावी गेले होते. गुरुवारी मयूर शिवणी रसूलापूर गावी निघून गेला, तर पूनम ही माहेरीच थांबली. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मयूरने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्या माहितीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी मयूरचा मृतदेह नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविला.दरम्यान, मयूरने आत्महत्या केल्याची माहिती पूनमला फोनवरून कळविण्यात आली. पतीच्या निधनाची वार्ता कळताच पूनमला धक्का बसला. तिनेही दुपारी २.३० च्या सुमारास विष प्राशन केले. यादरम्यान शेतात असलेले पूनमचे वडील रामराव उंबलकार यांना जावयाच्या आत्महत्येबद्दल माहिती प्राप्त झाली. त्यांनी शिवणीला जाण्यासाठी घर गाठले असता, पूनमने विष प्राशन केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी पूनमला मृत घोषित केले. घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच पंचक्रोशीतील अनेकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. यामुळे मोठी गर्दी झाली होती.मयूरला दारूचे व्यसनमयूर शेतमजुरी करून कुटुंंबीयांचा उदरनिर्वाह करीत होता. त्याला मद्याचे व्यसन व जुगार खेळण्याचा नाद होता. त्यामुळे अनेकदा सासरे रामराव उंबलकार समजावून सांगायचे. जुगारात पैसे हरल्याच्या मानसिक तणावातून शुक्रवारी त्याने मद्याच्या अंमलातच आत्महत्या केल्याची चर्चा गावात सुरू होती.पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळल्यानंतर पत्नीनेही विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविले. या घटनेत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.- नरेश पारवे, पोलीस निरीक्षक, नांदगाव खंडेश्वर

टॅग्स :Deathमृत्यू