शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी बाहेरख्याली; पतीने संपविली जीवनयात्रा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: August 1, 2023 19:55 IST

पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्मघात करवून घेतला.

अमरावती : पत्नीच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्मघात करवून घेतला. दि. ३ जून रोजी सकाळी ९च्या सुमारास बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी, मृत ३९ वर्षीय तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी दि. ३१ जुलै रोजी रात्री १०.२१ च्या सुमारास मृताची पत्नी व तिचा प्रियकर सनी उर्फ अमन सहारे (रा. बेलपुरा) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या रवींद्र नामक ३९ वर्षीय युवकाचे एका तरुणीशी आर्य समाजात लग्न झाले होते. लग्नानंतर ती त्याच्या घरी नांदावयास गेली. त्यावेळी आरोपी सनी सहारे हा त्याच्याकडे नेहमीच येत राहायचा. तो रवींद्रच्या पत्नीशी अश्लील चाळे करायचा. काही दिवसांनी ती बाब रवींद्रला माहीत झाली. त्यामुळे त्याने ती बाब स्वत:च्या बहिणीला सांगितली. आपण लग्न करून फसलो, पत्नीचे व सनी सहारे यांच्यात अफेअर असल्याचेही त्याने नातेवाइकांना सांगितले होते.

दोघांकडून जिणे मुश्किलपत्नी व सनी सहारे याने रवींद्रला त्रास देणे सुरू केले. त्याचे जीवन जगणे मुश्किल केले. त्याला हैराण करून सोडले. तू मर, असे बोलून त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. पत्नी व तिच्या प्रियकराचा त्रास अलीकडे अधिकच वाढल्याने त्याने दि. ३ जून रोजी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

टॅग्स :AmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट