शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आमदार वजाहत मिर्झांवर एसीबीकडून लाच स्वीकारण्याचा गुन्हा का नाही?

By गणेश वासनिक | Updated: October 7, 2023 21:08 IST

अब्दुल मन्नान अब्दुल गफूर यांचा सवाल; अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एसीबी महासंचालकांकडे तक्रार

गणेश वासनिक, अमरावती : विधान परिषदेचे आमदार वजाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्यात आली. ही घटना २८ मार्च २०२३ रोजी नागपूर येथील रवी भवन कक्ष क्रमांक ४५ व २० येथे घडली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा देखील दाखल केला. मात्र, आमदार वजाहत मिर्झा यांंच्यावर सहा महिन्यांनंतरही एसीबीने गुन्हा दाखल केला नाही, अशी तक्रार सेवानिवृत्त तहसीलदार अब्दुल मन्नान अब्दुल गफूर यांनी केली आहे.

अमरावती येथील बेरार मुस्लीम एज्युकेशन कॉन्फरन्स व उस्मानिया मशीद ट्रस्टचे सदस्य अब्दुल मन्नान यांनी आमदार वजाहत मिर्झा यांच्यावर लाचप्रकरणी गुन्हा दाखल करावा, यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. नागपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या २९ मार्च २०२३ रोजीच्या एफआयआरनुसार सदर पोलिस ठाण्यात एसीबीच्या पोलिस निरीक्षकांनी आमदार मिर्झा यांना वगळून दिलीप खाेडे व शेखर भोयर या दोघांविरुद्ध गुन्हा क्रमांक ०१४१/२०२३ अन्वये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे नियम ७ अ व भादंवि संहिता १८६० चे कलम ३८४, ३८७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, रवींद्र भुयार यांच्या तक्रारीनुसार आमदार वजाहत मिर्झा, दिलीप खाेडे व शेखर भोयर अशी तिघांची एक कोटींच्या लाचप्रकरणी साखळी असताना २५ लाखांची लाच स्वीकारण्याच्या गुन्ह्यात मात्र आमदार मिर्झा यांना ‘तो मी नव्हेच’ अशी वागणूक एसीबीकडून दिली जात आहे. आता एसीबी चौकशी करीत आहे. कायदेतज्ञ्जाचे निरीक्षण नोंदविले जात आहे. आमदार मिर्झाच्या गुन्ह्यात सहभागाबाबतची लिंक पूर्ण होत नसल्याने हे प्रकरण न्यायालयात टिकणार नाही, असा जावईशोध म्हणजे आरोपींना अभय देण्याचा प्रकार असल्याचे तक्रारीतून अब्दुल मन्नान यांनी म्हटले आहे.कशासाठी मागितली होती एक कोटींची लाच?

आरटीओ भुयार यांच्या विरोधातील महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा मुद्दा विधान परिषदेत आमदार वजाहत मिर्झा यांनी उचलू नये, त्याविषयी सभागृहात चर्चा होऊ नये, हा विषय बाहेरच मिटविण्यासाठी दिलीप खोडे, आमदार वजाहत मिर्झा, शेखर भोयर यांनी आरटीओ भुयार यांना एक कोटीची लाच मागितली होती. २५ लाखांची लाख स्वीकारताना पकडले गेले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग