शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्याला नोबल, ऑस्कर पुरस्कार का नाही?

By गणेश वासनिक | Updated: July 23, 2023 19:11 IST

शंकरबाबा पापळकर यांची खंत, संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य समेलन- २०२३ चे उद्घाटन

अमरावती : राज्यात अनेक प्रसिद्ध तथा नामवंत मराठी साहित्यीक असून त्यांचे साहित्य देखील दर्जेदार आहे. मात्र, एकाही मराठी साहित्याला नोबल अथवा ऑस्कर पुरस्कार मिळू शकले नाही, ही खेदाची बाब असल्याची भावना अनाथाचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत अमरावती विभाग द्वारा आयोजित संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या के. जी. देशमुख सभागृहात संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य समेलन- २०२३ चे उद्घाटक म्हणून त्यांनी विचार मांडले. साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानी डॉ. अरविंद देशमुख तर स्वागताध्यक्ष डॉ. गजानन हेरोळे हे होते. विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, पोलिस उपायुक्त विक्रम साळी, नंदकिशोर पाटील, मिलिंद रंगारी, शिवा प्रधान, गांधारी पापळकर, अविनाश राजगुरे, पद्माकर मंडवधरे आदी उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना शंकरबाबा पापळकर म्हणाले, संत गाडगे बाबा यांच्या सहवासात काही क्षण घालवता आले, मी स्वत:ला भाग्यशाली मानतो. मात्र, जो माणूस कधी शाळेत गेला नाही. शिक्षणाचा गंध नाही. पण त्या माणसाच्या नावाला विद्यापीठाचे नाव दिले जाते, ही बाब ईतिहासात नोंद करणारी आहे. आणि त्याच अमरावती विद्यापीठात संत गाडगे बाबा राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन झाले, हा दुर्मिळ योग आहे. परंतु, आता या साहित्य संमेलनातून साहित्यीकांनी प्रतिज्ञा करावी की, येत्या काळात मराठी साहित्य हे सातासमुद्रपार गेले पाहिजे. विदेशात दर्जेदार मराठी साहित्याची दखल व्हावी आणि नोबल, ऑस्कर पुरस्कार मिळावे, अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली. उद्घाटनाचे संचालन दीक्षा भावे यांनी केले.

प्रारंभी ग्रंथदिडी, संमेलनाचे उ्दघाटन, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, प्रबोधनकारी कवी संमेलन आणि समारोपीय सत्राने संमेलनाचे सूप वाजले.