शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक मागणी असलेल्या 'त्या' वाणाचा तुटवडा का आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:33 IST

Amravati : केवळ खारपाणपट्ट्यात 'त्या' वाणाची मागणी जास्त असते, जिल्ह्यात अन्य वाणांचीही मागणी आहे.

गजानन मोहोड लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खारपाणपट्टयात सर्वाधिक मागणी असलेल्या संकरीत कपाशीच्या विशिष्ठ वाणाची मागणी आता जिल्ह्याभरात वाढली आहे. गतवर्षी कृषी कर्मचाऱ्याच्या कृषी उपस्थितीत व पोलिस बंदोबस्तात बियाणे विकण्याची वेळ कृषी विभागावर आली होती. यातून यंदा काही धडा घेतल्याचे दिसत नाही, अशा परिस्थितीत यावेळी 'त्या' वाणांचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा पडण्याची शक्यता आहे. 

चार दिवसात मान्सून धडाका देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चार दिवसांपासून पावसाची उसंत असल्याने शेतकऱ्यांद्वारा पेरणीपूर्व मशागत सुरू आहे. मागच्या हंगामात कपाशीच्या एका विशिष्ठ वाणाची मागणी जास्त होती. त्यातुलनेत कंपनीद्वारा कमी पुरवठा करण्यात आल्याने बियाणे उपलब्ध असलेल्या केंद्रात कृषी विभागाने रेशनिंग केले होते. तेथे कृषी सहायकांच्या निगराणीत व पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बियाणे विक्री करण्यात आली होती.

यंदादेखील 'त्या वाणाची मागणीसोबतच त्याच कंपनीच्या अन्य एक वाणाची मागणी वाढत आहे. माहितीनुसार यंदा १.२० लाख पाकिटांची मागणी कंपनीकडे नोंदविण्यात आलेली आहे. शिवाय कपाशीच्या अन्य वाणांचेही बियाणे पुरेसे उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

कपाशीच्या 'त्या' बियाण्यांची जिल्हास्थितीयंदा कपाशीच्या 'त्या' वाणाच्या १.२० लाख पाकिटांची मागणी कंपनीकडे नोंदविली होती. त्यातुलनेत ७४,१२० पाकिटे जिल्ह्यात उपलब्ध झाली आहेत. यामध्ये अमरावतीमध्ये सर्वाधिक ३९,७६०, धामणगाव ७,८४०, दर्यापूर ११,३००, भातकुली १९८०, अंजनगाव २६४०, अचलपूर १९८०, मोर्शी २७८०, वरूड २३६० व तिवसा तालुक्यात ३४८० पाकिटांचा पुरवठा झालेला आहे.

विशिष्ठ वाणांच्या मागणीचे जिल्ह्यात विविध बेल्टजिल्ह्यात केवळ संकरीत कपाशीच्या त्याच वाणाची मागणी आहे, असे नव्हे तर प्रत्येक बेल्टमध्ये वेगवेगळ्या वाणांची मागणी असल्याचे एसएओ सातपुते यांनी सांगितले. वरूड, मोर्शी तालुक्यात वेगळ्याच वाणाची आहे, तर चांदूर रेल्वे, धामणगाव तालुक्यात कपाशीच्या वेगळ्या वाणाची मागणी असते.

"संकरीत कपाशीच्या सर्वच वाणांची उत्पादकता सारखीच आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ठ वाणाचा आग्रह धरू नये, बियाण्यांसाठी कंपनी एकत्रितपणे मागणी नोंदविते, त्या वाणांच्या बियाण्यासाठी कंपनीला पत्र दिले आहे."- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Amravatiअमरावतीcottonकापूस