शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

गर्भवती महिलांमध्ये सिझेरियन डिलिव्हरीचे प्रमाण इतके का वाढले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:46 IST

Amravati : जिल्हा स्त्री रुग्णालयात दहा महिन्यांत ३४१६ महिलांचे सिझेरियन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या दहा महिन्यांत रुग्णालयात ५६५५ महिलांची प्रसूती झाली. ३४१६ सिझेरियन झाले आहे. याठिकाणी ऑन कॉलवर असलेल्या डॉक्टरांचा सर्वाधिक भर हा सिझेरियन प्रसूतीवर असल्याची आकडेवारी सांगते.

जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरुवातीला याठिकाणी नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण जास्त होते; परंतु गेल्या काही वर्षामध्ये येथील नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण कमी झाले असून, सिझेरियनचे प्रमाण वाढले आहे. जवळपास ६० ते ६५ टक्के दाखल महिलांचे सिझेरियन होत असल्याचे चित्र आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने कंत्राटी पद्धतीने येथे डॉक्टर कार्यरत आहेत. प्राप्त माहितीनुसार याठिकाणी कंत्राटी पाच डॉक्टर कार्यरत असून, चार डॉक्टर हे ऑनकॉल तर एक डॉक्टर फुलटाइम कार्यरत आहेत.

महिन्याला करतात ८० ते ९० सिझेरियनऑनकॉल डॉक्टरांना प्रत्येक सिझेरियनमागे चार हजार रुपये देण्यात येतात. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ऑन कॉल कार्यरत डॉक्टर हे महिन्याला ८० ते ९० सिझेरियन प्रसूती करतात. त्यामुळे एका सिझेरियनमागे ४ हजार याप्रमाणे महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपयांची कमाई हे डॉक्टर करत आहेत. त्यामुळे त्यांचा भर जास्त सिझेरियन प्रसूतीवर असल्याचे बोलले जात आहे. 

क्लास वन प्रसूतितज्ज्ञ पद रिक्तचजिल्हा स्त्री रुग्णालयातील येथे सध्या पाच क्लासवन डॉक्टरांची पदे मंजूर आहेत, परंतु यातील केवळ तीन पदे भरली आहेत. तर स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ, तसेच बधिरीकरणतज्ज्ञ अशी दोन पदे रिक्त आहेत, तर क्लास टूमध्येही एकूण १९ पदे मंजूर असून, ५ पदे रिक्त आहेत. यामध्येही दोन पदे हे स्त्री प्रसूतीतज्ज्ञांची रिक्त आहेत.

१५९ बालकांचा झाला मृत्यूजिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान १५९ बालकांचा, तर एका मातेच्या मृत्यूची नोंदही रुग्णालय प्रशासनाने केली आहे.

"रुग्णालयातील रुग्णांची संख्या लक्षात घेता ४ कंत्राटी डॉक्टर कार्यरत आहेत, तर एकच डॉक्टर हे ऑन कॉल सेवा देत आहेत. मागील दहा महिन्यांत रुग्णालयात एकूण ५ हजार ६५५ प्रसूती झाल्या आहेत."- डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक

टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल