शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

अपघातास जबाबदार कोण?

By admin | Updated: April 23, 2016 00:04 IST

एक दोन नव्हे रक्तांनी माखलेल्या परतवाडा शहरातील चार अपघातांची मालिका थांबणार केव्हा? त्याला जबाबदार कोण?

रक्तरंजित होळी थांबणार केव्हा ? : बापलेकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कारनरेंद्र जावरे परतवाडाएक दोन नव्हे रक्तांनी माखलेल्या परतवाडा शहरातील चार अपघातांची मालिका थांबणार केव्हा? त्याला जबाबदार कोण? अशा अपघातानंतर काही तास चालणाऱ्या चर्चेनंतर प्रशासनाचा नाकर्तेपणा नागरिकांना हिंसक वळण घेण्यासह कायदा हातात घेण्यास बाध्य करणारा ठरला. त्यामुळे संतापजनक चित्र जुळ्या शहरात पहावयास मिळाले. परतवाड्यात अंजनगाव स्टॉप ते जयस्तंभ चौकापर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले. पुढे जयस्तंभ चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर अंतिम टप्प्यात आहे. चौपदरीकरणात तयार करण्यात आलेल्या फुटपाटावर लहाण व्यवसायिकंनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना रस्यांवरून चालावे लागत आहे. त्याच रस्त्याच्या कडेला दुचाकी, चारचाकी वाहणे उभी राहत असल्याने चौपदरीकरणाचा रस्ता एकेरी वाहतूक करणारा ठरला आहे.वाहतूक विभाग हतबलशहरात अपघाताची मालिका सुरूच आहे. परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा या तीन पोलीस ठाण्यांसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग आहे. मग अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर पालिकेला पत्र देऊनसुध्दा कुठलीच कार्यवाही होत नाही. वाहक पोलीस विभागात एकूण ३७ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मान्य असून केवळ १७ कर्मचारी तैनात आहेत. २० जागा रिक्त आहेत. परतवाडा शहरात मुख्य अपघात स्थळ असलेल्या चांदूरबाजार नाका, अचलपूर नाका, मिल कॉलनी स्टॉप, बसस्थानक, जयस्तंभ चौक, लालपूल, अंजनगाव स्टॉप, चिखलदरा स्टॉप, बैतुल स्टॉप, दुर्राणी चौक, गुजरी बाजार आदि ठिकाणीसुध्दा कर्मचारी नसल्याने वाहतूक विभागावर नामुस्की ओढवली आहे.जुळया शहरात अंदाजे तीन चाकी आॅटोंची संख्या दोन हजारांवर आहे. शहरातील महामार्गावर वाट्टेल तिथे थांबण्यासह, मधात उभे करणे, चालताना मागून वाहन येत असल्याची पर्वा न करता आॅटो पलटविण्याचा पराक्रम सुरू आहे.गतिरोधक जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबितरस्ता चौपदरीकरणानंतर वाढते अपघात पाहता, वाहतूक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जयस्तंभ चौक, अंजनगाव, चिखलदरा, बैतूल स्टॉप, आठवडी बाजार, बसस्थानक आदि महत्वाच्या ठिकाणी गतीरोधक बसविण्याचे पत्र दिले. तर नियमानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे ते पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठविल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांना समितीतर्फे मान्यता दिल्यावर गतीरोधक तयार करण्यात येतील. भाग तो पर्यत किती जणांचा नाहक बळी जाईल हे सांगणे कठीण आहे.अतिक्रमणाविषयी पालिका उदासीनशहरात अपघाताची मालीका सुरु असतांना अचलपूर नगर पालीका भाग हा रक्तरंजीत खेळ, तमाशा म्हणून बघीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झालेले अतीक्रमण काढण्याचे पत्र, त्यामुळे वाहतूकीची कोंडी होवून अपघात होत असल्याचे वाहतूक विभागाने लेखी कळविले आहे. परंतु पालिकेत मुख्याधिकारी चार दिवसांपासून विनापरवानगी कुठे गेले याचा शोध नगराध्यक्षांना घ्यावा लागत आहे. सदर पत्राबाबत नगराध्यक्ष रंगालाल नंदवंशी यांच्याशी विचारणी केली असता त्यांनी हा खुलासा केला. मुख्याधिकारी धनंजय जावळीकरांच्या दुर्लक्षामुळे विकसकामे रखडल्याचा आरोप होत आहे.रिंंगरोड आवश्यकपरतवाडा शहराबाहेरुन जड वाहनांसाठी मंजूर असलेला प्रस्तावित रिंंंगरोड अपघात टाळण्यासाठी आवश्यक झाले आहे. चांदूर बाजार नाका ते कविठा माग्र्ेि बैतूल, धारणी मार्गाला हा रिंंगरोड जोडण्याचा जुना प्रस्ताव आहे. परतवाडा शहरातून इंदूर, अकोला, बैतूल, राज्य व आंतराज्यीय वाहतुकीची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.बापलेकांवर अंत्यसंस्कारगुरुवारी मृत दादाराव पंधरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी ब्राम्हणवाडा गोविंदपूर येथे दुपारी १.२० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. दर्शनचे शवविच्छेदन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार केल्यावर त्याचा मृतदेह परिजनांना १०.३० वाजता देण्यात आला. दादाराव पंधरे यांचे शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले.आज वाहतुकीवर बैठकशहरातील वाढते अपघात, अनियंत्रित वाहतूक, अतिक्रमण आणि सर्व विषयावर शनिवारी सायंकाळी ६ वाजता परतवाडा पोलीस स्टेशनला महत्त्वाची बैठक घेण्यात आली. व्यवसायी, अधिकारी, पत्रकार व संबंधित विभागाला बोलविण्यात आल्याचे ठाणेदारांनी सांगितले.