शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी हत्याकांड घडविणारा तिसरा कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतात सुधीर रामदास बोबडे (५२, कॉलनी परिसर, कांडली) व ४८, वर्षीय महिलेचा मृतदेह शेतातील शेडमध्ये आढळून आला होता. प्रथमदर्शनी पोलिसांना आत्महत्या वाटत असली तरी बुधवारी रात्री मृत महिलेच्या पतीने परतवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आता त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : येणी पांढरी शिवारात बुधवारी सकाळी १० वाजता उघडकीस आलेल्या दुहेरी हत्याप्रकरणात गुरुवारी सुधीर बोबडेवर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. हत्याकांड घडविणारा तिसरा कोण, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर चार चमू नियुक्त केल्या. त्यामध्ये सहा अधिकारी व २४ कर्मचारी अशा ३० जणांची नियुक्ती करण्यात आली. त्या स्वतंत्र तपास करणार आहेत.येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतात सुधीर रामदास बोबडे (५२, कॉलनी परिसर, कांडली) व ४८, वर्षीय महिलेचा मृतदेह शेतातील शेडमध्ये आढळून आला होता. प्रथमदर्शनी पोलिसांना आत्महत्या वाटत असली तरी बुधवारी रात्री मृत महिलेच्या पतीने परतवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आता त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधातून घडलेल्या या हत्याकांडाचे गांभीर्य पाहता शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक टीमकडून झालेला तपास आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या चार चमूंनी वेगवेगळ्या केलेल्या तपासाअंती या प्रकरणातील गूढ पुढे येणार आहे. त्याचा निष्कर्ष कितपत धक्कादायक असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मृत महिला, सुधीरच्या पत्नीची हाणामारी- मृत महिला व सुधीरची पत्नी यांच्यात यापूर्वी दोघांच्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून हाणामारी झाल्याचे पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. या दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे सुधीरची पत्नी तिच्या घरासमोर येऊन भांडण करून सांगत होती. यादरम्यान सुधीर व मृत महिला एकमेकांना चाकूने मारून हत्या करू शकत नाहीत. रात्री त्यांच्यावर कोणी तरी पाळत ठेवून हत्या केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस अधीक्षक घटनास्थळी- जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुरुवारी सकाळी येणी पांढरी येथील शेतशिवारात घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जिल्हा क्राईम ब्रँच, परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा येथील अधिकारी यांची बैठक घेतली व आवश्यक सूचना दिल्या. 

सुधीर बोबडेवर अंत्यसंस्कार- बुधवारी शवविच्छेदनासाठी वेळ झाल्याने सुधीर बोबडे याच्या मृतदेहाचे गुरुवारी सकाळी तीन डॉक्टरांच्या चमूने शवविच्छेदन केले. दुपारी अंत्यसंस्कार पार पडले. कुठलीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलीस विभाग सतर्क आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस