शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन जिल्ह्यांतील मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन ठरल्या पांढरा हत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 21:05 IST

गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळावरील पुरावे त्वरित घेता यावेत, याकरिता राज्य शासनाने ४५ ठिकाणी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दिल्या आहेत.

अमरावती - गंभीर गुन्ह्यांमध्ये घटनास्थळावरील पुरावे त्वरित घेता यावेत, याकरिता राज्य शासनाने ४५ ठिकाणी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन दिल्या आहेत. अमरावती विभागात सहा व्हॅन देण्यात आल्या. मात्र, तीन जिल्ह्यांतील मोबाइल व्हॅन या सहायक रासायनिक विश्लेषक वर्ग-२ ही पदे भरली नसल्याने पांढरा हत्ती ठरल्या आहेत.

खुनाचा गुन्हा, बलात्कार, अंमली पदार्थ व इतर महत्त्वाच्या एखाद्या गुन्ह्यात घटनास्थळावरील रक्ताचे नमुने वा इतर गुन्ह्यांतील कलेक्शन योग्य पद्धतीने घेण्याचे ज्ञान पोलिसांना नसते. ही कार्यवाही शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आल्या आहेत. विभागात मागील वर्षी अमरावती येथे पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक स्तरावर दोन, तर इतर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक अशा सहा मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आल्या.

तथापि, यासाठी महत्त्वाची सहायक रासायनिक विश्लेषक वर्ग-२ ची कायमस्वरूपी पदे शासनाने भरली नाहीत. केवळ बुलडाणा व अकोला येथे कंत्राटी नेमणूक करण्यात आली आहे. विभागातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये घटनास्थळावरील पुराव्यांची हाताळणी योग्य न झाल्याच्या स्थितीत अमरावती येथील प्रादेशिक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पुराव्यांचे अचूक विश्लेषण होत नाही. मात्र, तरीदेखील सहायक रासायनिक विश्लेषकाची पदे कायमस्वरूपी भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अद्याप कार्यवाही केली नाही. 

विभागात अमरावती येथे पोलीस आयुक्तालय आहे. शहराचा आणि एकंदर जिल्ह्याचा आवाका मोठा असताना येथेही पदे रिक्त आहेत. अमरावती शहर व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यात प्रादेशिक न्यायसाहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (अमरावती) येथील अधिकाºयांना घटनास्थळावर पाचारण केले जाते. मोबाइल फॉरेन्सिक व्हॅनसाठी दिलेली पदे त्वरित भरली, तर अनेक  महत्त्वाचे  गुन्हे उघड होण्यास मदत होईल.   

अत्याधुनिक किटचा वापरफॉरेन्सिक मोबाइल व्हॅन गुन्हा घडल्यानंतर त्वरित घटनास्थळावर नेऊन रक्तांचे नमुने, हाताचे ठसे व गुन्ह्यात वापरण्यात आलेले इतर साहित्य जप्त केले जाते. व्हॅनमध्ये सदर नमुने घेण्यासाठी अत्याधुनिक  किट देण्यात आली आहे. 

पुढील महिन्यात कंत्राटी पदभरतीची शक्यताशासनाने आॅक्टोबरमध्ये रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात काढली. पुढील आठवड्यात यासाठी परीक्षा होणार असल्याची माहिती आहे. सहायक रासायनिक विश्लेषक वर्ग-२ ची कायमस्वरूपी पदे एमपीएससीमार्फत भरली जातात. तोपर्यंत कंत्राटी पदांवरच कारभार चालवावा लागणार आहे.

अमरावती जिल्ह्यात पोलिसांकडून माहिती मिळताच आम्ही मोबाईल फॉरेन्सीक व्हॅनचा वापर करून घटनास्थळ गाठतो. इतर जिल्ह्यात पोहोचणे शक्य होत नाही. प्रत्येक जिल्ह्यात पाच पोलिसांच्या पथकाला किट कशी वापरावी, याचे ज्ञान दिले आहे. विजय ठाकरे, उपसंचालक, प्रादेशिक न्यायसाहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, अमरावती