शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
4
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
5
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
6
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
7
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
8
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
9
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
10
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
11
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
12
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
13
पुतीन परतले, पुढे...?
14
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
15
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
17
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
18
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
19
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
20
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

'आयएफएस' बदल्यांची फाइल अडली कुठे ? वनअधिकाऱ्यांनी बदलीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:35 IST

Amravati : आयएएस, आयपीएसच्या बदल्या जोरात, मात्र भारतीय वन सेवेतील अधिकारी प्रतीक्षेत

गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आला असताना, भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र अद्यापही रखडलेल्या आहेत. सुमारे ५० ते ५५ आयएफएस अधिकारी बदली पात्र असताना मंत्रालयात ही फाइल कुठे अडली की कोणी अडवून ठेवली? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. बदली समितीची बैठक झाल्यानंतरही 'आयएफएस'ला नवीन जागेवर पोस्टिंग दिले गेले नाही, हे विशेष.

आयएफएस बदल्यांसाठी संबंधित समितीची बैठक झाल्याची माहिती असून, नव्या नियुक्त्यांसाठी यादीदेखील तयार करण्यात आली आहे. मात्र, ही यादी अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात का पाठवण्यात आली नाही, याचे गूढ कायम आहे. शालेय वर्ष सुरू झाल्यामुळे अनेक आयएफएस अधिकारी स्वतःच्या कुटुंबासोबत स्थायिक होण्याच्या अपेक्षेने नवीन पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत. काही अधिकारी मंत्रालयात वारंवार चकरा मारून थकले असून, काहींनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन बदल्यांच्या विनंती केल्याचे समजते. एकंदरीत 'आयएफएस' यांच्या रखडलेल्या बदल्यांनी वन मंत्रालय प्रकाश झोतात आले आहे.

'शिरीष' यांचे नियुक्ती परवानगीविनाच कामकाज

  • मुख्यमंत्री कार्यालयातून सात मंत्र्यांच्या खासगी सचिवांच्या नियुक्त्तीला परवानगी दिली नाही.
  • असे असताना नवी मुंबई महापालिकेतील 'शिरीष' नामक एक अभियंता वनमंत्र्यांचे खासगी सचिव म्हणून कारभार जोरात हाकत आहेत.
  • 'शिरीष' यांची खासगी सचिव म्हणून नियुक्तीसाठी सीएमओ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला आहे, परंतु परवानगी मिळाली नसतानाही 'शिरीष' यांनी मंत्रालय ते नवी मुंबई महापालिका, असा दुहेरी कारभार चालविला आहे.

'आयएफएस' यांच्या बदल्यांसंदर्भात वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.

आज सीएमओ कार्यालयाकडे फाइल जाण्याचे संकेत

  • वन विभागातील 'आयएफएस' यांच्या रखडलेल्या बदल्यांची फाइल सोमवार, २३ जून रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविली जाणार असल्याचे संकेत आहेत.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आठवड्यात विदेश दौऱ्यावर जात असल्यामुळे 'आयएफएस' यांच्या बदली फाइलवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी अनिवार्य आहे. त्याअनुषंगाने वन मंत्रालयाने लगबग चालविल्याची विश्वसनीय माहिती आहे.
  • ५० ते ५५ आयएफएस यांच्या बदल्या ॐ होणार आहेत, तर २७ नवीन 'आयएफएस' अवॉर्डप्राप्त 'डीसीएफ' यांची मुंबईवारी जोरात आहे.
टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती