शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

फिरत्या चाकावर पोट; कधी मिळणार मातीकला बोर्डाच्या योजनेचा लाभ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 13:50 IST

Amravati : पाच वर्षांत नाही एक रुपयाचाही निधी, तांत्रिक युगात ३० लक्ष कुंभार बांधवांची उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्क धामणगाव रेल्वे : ओल्या मातीपासून सुरई, माठ, खुजे, रांजण, कुंड्या, घट, गाडगी, मडकी, झाकण्या, पणत्या, कौले, विटा, कुंड्या घडवून आपल्या संसाराचा गाडा चालविणाऱ्या विदर्भातील ३० लक्ष कुंभार बांधव तंत्रज्ञानाच्या युगात मागास राहण्याचा अभिशाप भोगत आहेत. राज्य शासनाने स्थापन केलेल्या मातीकला बोर्डाला पाच वर्षात एक रुपया दिला नाही. परिणामी त्यांच्या योजनाच कार्यान्वित न झाल्याने या समाजबांधवांवर उपासमारीची पाळी आली आहे.

कुंभार समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक. अलीकडे संत गोरा कुंभार यांची परंपरा ते सांगतात. तथापि, वंशपरंपरागत असलेल्या त्यांच्या कुंभारकलेला आधुनिक तंत्रज्ञान व चिनी वस्तूंमुळे उतरती कळा आली आहे. त्यामुळे आजघडीला त्यांच्या कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आला आहे.

विदर्भात अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, गोंदिया या जिल्ह्यात कुंभार समाज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांनी थाटलेला वंशपरापंरागत व्यवसाय गावोगावी पाहावयास मिळतो. मात्र, त्यांनी मातीपासून तयार केलेल्या भांड्यांना कोणत्याच जिल्ह्यात स्थायी बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे गावखेड्यात भटकंती करून ही मातीची भांडी विकावी लागत आहेत. वाढत्या महागाई व दुष्काळात कसे तग धरून राहायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याची व्यथा वर्धा नदीकाठी असलेल्या ओमेश वझे यांनी मांडली.

दोन वेळेची भागत नाही सांजसतत तीन महिने तयार केलेली मातीची भांडी घेऊन बाजारात विक्रीसाठी गेल्यानंतर ग्राहकही कमी किमतीत मागतात. एकीकडे मातीपासून तर इंधनापर्यंत सर्वच विकत आणावे लागते. व्यवसायासाठी लागणारा खर्च व यातून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे केल्यानंतर दोन वेळेची सांजही भागत नाही.

मातीच्या भांड्यांची जागा घेतली प्लास्टिकने३० वर्षांपूर्वी मातीच्या भांड्यांना मोठी मागणी होती. घराघरात स्वयंपाकासाठी, पाणी गरम करण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी, अंघोळीसाठी मातीपासून तयार झालेल्या भांड्यांचा वापर व्हायचा. मात्र, आजघडीला मातीच्या भांड्यांची जागा स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांनी घेतली आहे.

मातीकला बोर्ड केवळ नावालाचराज्य शासनाने कुंभार बांधवांच्या उन्नतीसाठी राज्यात मातीकला बोर्ड स्थापन केले. खादी ग्रामोद्योग अंतर्गत दहा कोटींचे अनुदान तसेच मातीपासून दिवा, गंगाळ, घागर अशा वेगवेगळ्या वस्तू बनवून प्रदर्शनात विकण्याकरिता देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्याप एक रुपयाचाही निधी देण्यात आला नाही.

विदर्भात ३० लाखांच्या घरात कुंभार समाज आहे. हा समाज ओबीसी प्रवर्गात मोडतो. तथापि, स्वतःचे शिक्षण विद्यार्थ्यांना स्वतः करावे लागते. कोणत्याही सवलतीचा लाभ मिळत नाही. शासन समाजाच्या विकासासंदर्भात योजना आखतात. मात्र, त्या कागदावरच आहेत. आता तरी सकारात्मक दृष्टिकोनाने कुंभार समाजाकरिता योजना राबवाव्यात.- डॉ. श्रीराम कोल्हे, अध्यक्ष, संत गोरोबाकाका समाज संस्था

टॅग्स :artकलाUnemploymentबेरोजगारी