धामणगाव रेल्वे : पोलिसांप्रमाणे होमगार्डदेखील त्याच प्रकारची जबाबदारी पार पाडतात. त्यामुळे पोलिसांप्रमाणे त्यांना वेतन मिळायला हवे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या होमगार्डवर अन्याय सुरू झाला आहे. त्यांना न्याय कधी देणार, असा सवाल आमदार प्रताप अडसड यांनी विधान मंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला.
राज्याच्या पोलीस दलाप्रमाणेच होमगार्ड जवानांचेही कायदा-सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान आहे. मात्र, आघाडी सरकारच्या काळात या होमगार्ड बांधवांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. कोरोनाकाळात त्यांना कोणतीही सुविधा मिळाली नाही तसेच त्यांचा वेतनाचा प्रश्न सुटला नाही. त्यांना मुदतवाढ मिळाली नाही. या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार, असा सवाल आमदार अडसड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे.
---------------