शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय वनअधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा केव्हा? दोन वर्षांपासून सरकारचे दुर्लक्ष

By गणेश वासनिक | Updated: June 30, 2024 23:55 IST

प्रधान मुख्य वनसंरक्षकांना प्रस्ताव सादर, राजपत्रित वन अधिकारी संघटनांचा पुढाकार...

अमरावती : राज्याच्या वनविभागात ‘आयएफएस’ विरुद्ध ‘नॉन-आयएफएस’ हा वाद पाचवीलाच पुजलेला आहे. मात्र विभागीय वनअधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘आयएफएस ट्रॉफी’चा प्रस्तावदेखील प्रलंबित आहे. गत दोन वर्षांपासून २८ विभागीय वनअधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा मिळत नसल्याने प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे ‘डीएफओं’च्या न्यायिक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वनअधिकारी संघटनेने पुढाकार घेतला आहे.

विभागीय वन अधिकाऱ्यांना ठरावीक सेवेचा कार्यकाळ पूर्ण होताच ‘आयएफएस’ दर्जा बहाल केला जातो. त्याकरिता वन विभाग राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवितात. त्यानंतर राज्य सरकार हे केंद्र सरकारकडे विभागीय वनअधिकाऱ्यांना मिळणाऱ्या ‘आयएफएस’ दर्जासंदर्भात मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविते; परंतु, दोन बॅचचे तब्बल २८ विभागीय वनअधिकारी ‘आयएफएस’ दर्जा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक शेैलेंद्र टेभुर्णीकर यांनी सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी प्रस्तावाद्वारे संघटनेने केली आहे. आयएफएस दर्जा मिळण्यासाठी शासनाकडे वारंवार प्रस्ताव पाठवूनही त्यावर योग्य तो निर्णय होत नसल्याने विभागीय वनअधिकारी ‘आयएफएस’ लॉबीवर कमालीचे नाराज असल्याचे दिसून येत आहे.

७४ ‘नॉन-आयएफएस’ कार्यकारी अधिकार पदाच्या प्रतीक्षेतराज्य सेवेतील १०९ विभागीय वनअधिकाऱ्यांपैकी ३५ जणांना सामाजिक वनीकरण विभागात कार्यकारी पदाचा दर्जा मिळाला आहे. मात्र अद्यापही ७४ डीएफओंना कार्यकारी पदाचा अधिकार मिळाला नाही. तसेच दक्षता विभाग प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांना कुठलाही संवैधानिक अधिकार मिळत नसल्याची खदखद कायम आहे. त्यामुळे आयएफएस उपवनसंरक्षकांचे पंख छाटून त्यांचे काही अधिकार दक्षता विभागाकडे सोपवावेत, अशी मागणी पुढे आली आहे. दक्षता विभागाच्या ‘नॉन आयएफएस’कडे तपासणी नाके, वनव्यवस्थापन, संरक्षण हे सोपवावे. डीएफओंना आहरण व संवितरण अधिकारी नेमण्यात यावे. मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील आस्थापना ताब्यात देण्याचाही आग्रह आहे.

विभागीय वनअधिकाऱ्यांची कार्यकारी पदावर नियुक्ती व्हावी, यासाठी गत अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र ‘आयएफएस’कडून सतत दुर्लक्ष होत आहे. वनसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून विभागीय वन अधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा प्रदान करणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने प्रधान मुख्य वनसंरक्षकांना प्रस्ताव सादर केलेला आहे.- अमोल थोरात, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वनअधिकारी संघटना 

टॅग्स :forest departmentवनविभागGovernmentसरकार