शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

राज्यातील ११ आदिवासी प्रकल्पांना स्वतंत्र प्रकल्प अधिकारी केव्हा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 14:17 IST

Amravati : मेळघाट ते गडचिरोलीत दुहेरी पदभार योजनांना कसा मिळणार न्याय ?

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा (अमरावती) : राज्यातील ११ आदिवासी प्रकल्प कार्यालयांमध्ये मागील ३० वर्षांपासून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तेथील प्रकल्प अधिकारी व एसडीओ, असे दोन कारभार असल्याने दोन्ही विभागांना न्याय दिला जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे स्वतंत्र अधिकारी देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळात आदिवासी आमदार-खासदारांनी मागणी करताच झालेला निर्णय गुंडाळला का, असा सवाल यानिमित्त पुढे आला आहे. 

गतवर्षी मुंबई येथे जनजाती सल्लागार परिषदेच्या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत याबाबत घेण्यात आला होता. तत्कालीन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपुढे राज्यातील आमदार व खासदारांनी हा प्रश्न मांडला होता. तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, माजी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह आदिवासी क्षेत्रातील खासदार-आमदार उपस्थित होते. परंतु, दीड वर्षे लोटूनही अंमलबजावणी अजूनही झाली नाही.

न्यायालयाच्या आदेशात पळवाटाराज्यातील आदिवासी भागांमध्ये बालमृत्यू रोखण्यासाठी न्यायालयाच्या एका निर्देशानुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रकल्प अधिकाऱ्याचा पदभार स्वतंत्र देण्याचे आदेश होते. त्यानुसार आयएएस अधिकारी दिले गेले. त्यांना शासनाने एसडीओचेही कामकाज सोपविले.

राज्यात या ११ ठिकाणी दुहेरी कारभारराज्यातील पांढरकवडा, धारणी, अहेरी, भामरागड, किनवट, नाशिक, गडचिरोली, तळोदा, घोडेगाव, देवरी व चंद्रपूर या ११ एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा कारभार तेथीलच आयएएस असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे मागील किमान ३० वर्षापासून आहे.

"एक अधिकारी दोन महत्त्वाचे विभाग सांभाळतात. आदिवासींच्या शेकडो योजना गतिमान होत नसल्यामुळे स्वतंत्र प्रकल्प अधिकारी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील आदिवासींसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे."- केवलराम काळे, आमदार, मेळघाट 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाChikhaldaraचिखलदराMelghatमेळघाटAmravatiअमरावती