सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्य केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:00:51+5:30

शहरातील शक्य त्या ठिकाणी बँकांसमोर नगरपालिकाद्वारे सोशल डिस्टन्सिंग राखण्याकरिता बॅरिकेडिंग करण्यात आले. काही बँकांसमोर ते शक्य नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न चालले आहेत.

When is the seriousness of social distancing? | सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्य केव्हा?

सोशल डिस्टन्सिंगचे गांभीर्य केव्हा?

Next
ठळक मुद्देबँकांसमोर पुन्हा गर्दी। किराणा दुकाने, भाजी बाजारातही नागरिकांचा घोळका

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : शहरातील काही बँकांसमोर नागरिकांमार्फत मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. असेच चित्र दर्यापुरातील सेंट्रल बँकेसमोर शुक्रवारी पाहायला मिळाले.
शहरातील शक्य त्या ठिकाणी बँकांसमोर नगरपालिकाद्वारे सोशल डिस्टन्सिंग राखण्याकरिता बॅरिकेडिंग करण्यात आले. काही बँकांसमोर ते शक्य नसल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न चालले आहेत. प्रशासनाकडून भाजीपाला व जीवनावश्यक दुकानाच्या ठिकाणी ग्राहकांच्या उभ्या राहण्याच्या जागा आखून दिल्या असल्या तरीही काही भागातील किराणा दुकाने, बँका व भाजी बाजारमध्ये ग्राहकांकडून सर्रास सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. नगर परिषद व पोलीस प्रशासनाने गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: When is the seriousness of social distancing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक