शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

१०९ कोटींची मदत केव्हा ?

By admin | Updated: July 27, 2016 00:08 IST

गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ...

२ लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा : पीक विम्याच्या ५० टक्के प्रमाणात मदतगजानन मोहोड अमरावती गतवर्षीच्या दुष्काळासाठी सरसकट मदत न देता शासनाने शेतकऱ्यांना कपाशी व सोयाबीन पिकासाठी पीक विमा जाहीर झाल्याच्या ५० टक्के प्रमाणात विशेष मदत देण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतला होता. या निकषात जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांची मदत अपेक्षित असताना शासनाने अद्याप छदामही दिलेला नाही.गतवर्शी जिल्ह्याची पैसेवार ५० पैशांच्या आत ४३ पैसे असल्याने व याविषयी उच्च न्यायालयाची फटकार असल्याने शासनाने जिल्ह्यासह विदर्भातील ११ हजार ८३२ गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. मात्र केंद्राच्या एनडिआरएफच्या नवीन निकषाप्रमाणे मदत दिली नाही. मात्र, कपाशी व सोयाबीन पीकासाठी पीक विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला नाही, अशांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर रकमेच्या ५० टक्के प्रमाणात मदत करण्याचा निर्णय २ मार्च २०१६ रोजी घेतण्यात आला. तालुकानिहाय शेतकऱ्यांची माहिती शासनाने २२ रोजी मागविली व याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ एप्रिल रोजी सर्व तहसीलदारांना सूचना देऊन निकषप्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या मागविल्या मात्र विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बँकानी उशीरा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाला अहवाल मागील आठवड्यात तयार झाला.या अन्वये जिल्ह्यातील १९६ महसूली गावांमध्ये कपाशीसाठी दर्यापूर तालुक्यात १७११ शेतकऱ्यांनी ५९९७ हेक्टरच्या विमा काढलेला नाही तर सोयाबीनसाठी १ लाख ९५ हजार ८६१ शेतकऱ्यांनी २ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढलला नाही, असे एकूण १ लाख ९७ हजार ७०९ शेतकऱ्यांना २ लाख ३८ हजार ५१९ हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा जाहीर झालेल्या ५० टक्के प्रमाणात म्हणजेच १०९ कोटी ३६ लाख ५९ हजार १५० रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली असली तर शासनाने अद्यापपर्यत विशेष मदत दिलेली नाही.असा आहे विशेष मदतीचा शासनादेशअमरावती, नागपूर, औरंगाबाद व नाशिक विभागातील कापूस पीक तसेच अमरावती, नागपूर विभागातील सोयाबीन पिकांसाठी पिके विमा योजनेची मंडळनिहाय मदत जाहीर झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची मंडळनिहाय जाहीर केलेल्या रकमेच्या ५० टक्के प्रमाणात रक्कम शासन शेतकऱ्यांना देईल.कपाशीसाठी ३९ लाखांची मागणी दर्यापूर व चिखलदरा तालुक्यात कपाशीसाठी पीक विमा विशेष मदत देण्यात येणार आहे. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील १ हजार ७११ शेतक्यांना ३१ लाख ५७ हजार ५३६ व चिखलदरा तालुक्यातील १३७ शेतकऱ्यांना ७ लाख ८६ हजार ६४४ रुपयांची अशी एकूण १ हजार ८४८ शेतकऱ्यांना ३९ लाख ४४ हजार १८१ रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे. ९० हजार शेतकऱ्यांना पीक विमाजिल्ह्यात खरीप २०१५ या हंगामासाठी कपाशी व सोयाबीनसाठी ९१ हजार १४३ शेतकऱ्यांना ८२ कोटी २९ लाख ५ हजार ७९२ रुपयांचा पीक विमा जाहीर झाला आहे. यामध्ये कपाशीसाठी ४८२ शेतकऱ्यांना ५३८ हेक्टरसाठी ५ लाख ९२ हजार ७४७ रुपयेतर सोयाबीनसाठी ८० हजार १८६ शेतकऱ्यांना ९० हजार ६९५ हेक्टरसाठी ८२ कोटी २३ लाख १३ हजार ४५ रुपंयाचा विमा जाहीर करण्यात आलेला आहे.