शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

बेलोरा विमानतळाचे डिझाईन, प्लॅनिंग केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 11:18 PM

जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण होऊन सहा महिने झाले. तथापि, संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात निविदा प्रक्रिया मंत्रालयस्तरावर प्रलंबित असल्याने विमानतळाच्या विकासाचा गती मिळत नाही, हे वास्तव आहे.

ठळक मुद्देमंत्रालय स्तरावर निविदा प्रलंबित : ओएलएस सर्वेक्षणानंतरही विकासाला गती नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण होऊन सहा महिने झाले. तथापि, संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात निविदा प्रक्रिया मंत्रालयस्तरावर प्रलंबित असल्याने विमानतळाच्या विकासाचा गती मिळत नाही, हे वास्तव आहे.बेलोरा विमानतळाच्या विकासाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. त्याकरिता ७५ कोटी रुपयेदेखील मंजूर केले आहे. विमानतळाचे विकासाचे नवे धोरण ठरविताना ७५ पैकी १५ कोटी रूपयांचा पहिला टप्पा वितरीत केला आहे. त्याअनुषंगाने बेलोरा विमानतळाचे जानेवारी २०१८ मध्ये ओएलएस सर्वेक्षण करण्यात आले असून, तसा वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. ओएलएस सर्वेक्षण आटोपल्यानंतर विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंगसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवून कन्सल्टन्सी नेमणे आवश्यक आहे. मात्र, ही प्रक्रिया राज्याच्या सामान्य प्रशासन मंत्रालयात प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे. विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण, संरक्षणभिंतीचे काम, अमरावती-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गाला टी-पॉइंटवर जोडणारा जळू ते बेलोरा वळणमार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, आता विमानतळ विकासकामांसाठी डिझाइन, प्लॅनिंगला मान्यता मिळविणे अनिवार्य आहे. एकदा कन्सल्टन्सीची नेमणूक झाली की, येत्या काळात कोणती विकासकामे प्राधान्याने करावयाची ही बाब स्पष्ट होईल. परंतु, विमानतळाचे डिझाइन, प्लॅनिंगसाठी निविदा प्रक्रिया मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याने ही फाइल पुढे कधी सरकणार, याबाबत संभ्रम कायम आहे.ना. प्रवीण पोटे, सुनील देशमुखांसाठी कसोटीचंद्रपूर येथे नव्याने मंजूर झालेल्या विमानतळासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार भरभरून निधी खेचून नेत आहेत. मात्र, बेलोरा विमानतळावर पाहिजे त्या प्रमाणात विकासकामांना गती मिळाली नाही. विमानतळाची विकासकामे पूर्णत्वास आणून येथून विमानांचे टेकआॅफ व लँडिंग ही पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख यांच्याकरिता कसोटी आहे.शासनाकडे प्रस्तावित विकासकामांची यादीबेलोरा विमानतळाच्या सध्याच्या धावपट्टीची लांबी १३७२ मीटर असून, ती १८५० मीटर केली जाणार आहे. टर्मिनल इमारत उभारणे, अग्निशमन केंद्र, एटीसी टॉवर निर्मिती, अप्रन क्षमतेत वाढ, तीन एटीआर व एक एअर बस बोइंग, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, रस्ते चौपदरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था आदी कामे होणार आहेत.सन २०१८ अखेर बेलोरा विमानतळाहून विमाने धावणार असून, त्या अनुषंगाने शासनाने तयारी चालविली आहे. धावपट्टीच्या विस्तारासह अन्य विकासकामांच्या निविदा लवकरच काढल्या जातील. विमानतळाचे उर्वरित ६० कोटींचा निधी वितरित केला जाईल.- प्रवीण पोटेपालकमंत्री, अमरावती.मध्यंतरी बेलोरा विमानतळासंदर्भात ना. मदन येरावार यांच्याकडून पत्र प्राप्त झाले होते. सध्या विमानतळाचे विकासकामाची काय स्थिती आहे, याबाबत मंत्रालयातून जाणून घेतले जाईल. विमानसेवा सुरू करणे गरजेचे आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच अवगत केले आहे.- सुनील देशमुखआमदार, अमरावती.