शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात ‘कास्ट व्हॅलिडिटी’ समितीला अध्यक्ष केव्हा?; नागपूर, अमरावती विभागात प्रभारी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 20:46 IST

तीन वर्षांपासून समाजकल्याण ‘कास्ट व्हॅलिडिटी’ समितींच्या कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

अमरावती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिनस्थ असलेल्या विदर्भातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला कायमस्वरूपी अध्यक्षपद नाही. एका अध्यक्षांकडे चार ते पाच जिल्ह्यांचा प्रभार असल्याने ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची प्रकरणे कशी हाताळावी, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान नव्या शासनाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी पुढे आली आहे.

अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग संवर्गातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला जिल्हानिहाय समितीचे गठन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात समितीला अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य सचिव असे त्रिसदस्यीय समिती ‘कास्ट व्हॅलिडिटी’ची प्रकरणे हाताळतात.

मात्र, तीन वर्षांपासून समाजकल्याण ‘कास्ट व्हॅलिडिटी’ समितींच्या कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे नोकरी, शिक्षण, राजकीय ‘कास्ट व्हॅलिडिटी’चे प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. अशातच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सन २०११-२०१२ दरम्यान ‘कास्ट व्हॅलिडिटी’च्या जारी केलेल्या प्र्नकरणांची फेरतपासणी करण्याची मोहीम सुरू झाली आहे. मात्र, विदर्भात समितींना कायमस्वरूपी अध्यक्ष नसल्याने नियमित कामांसह ‘कास्ट व्हॅलिडिटी’ प्रकरणांच्या फेरतपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विदर्भातील अधिकाºयांकडे मराठवाड्याचा कारभार सोपविण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांनंतर शैक्षणिक प्रकरणे दाखल केले जातील. त्यामुळे समितीकडे अध्यक्ष प्रभारी असल्याने ‘कास्ट व्हॅलिडिटी’वर स्वाक्षरी तपासणी केव्हा करणार, ही गंभीर बाब निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भातील ‘कास्ट व्हॅलिडिटी’ समितींना कायमस्वरूपी अध्यक्ष देऊन हा गोंधळ थांबविणे हे गरजेचे आहे. अध्यक्षांकडे असा आहे जिल्ह्यांचा कारभार

  • प्रकाश खपले - वाशीम, नांदेड, हिंगोली, परभणी
  •  गुलाबराव खरात - अकोला, बुलडाणा
  •  विनय मून - अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली,
  •  प्रदीपुकमार डांगे - भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा
  •  हेमंतकुमार पवार - नागपूर 

 राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे विदर्भातील ‘कास्ट व्हॅलिडिटी’ समिती बाबतची कैफियत निवेदनातून मांडली आहे. गत सरकारच्या कार्यकाळात हा विभाग दुर्लक्षित होता. आता राहू नये, अशी अपेक्षा आहे.    - पंकज मेश्राम, विदर्भ प्रमुख, भीमशक्ती संघटना

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्र