शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इतवारा बाजारात किती ही गर्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 06:00 IST

महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागरिक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सावटात भयभीत झाले आहेत.

ठळक मुद्दे‘कोरोना’ - छेद सुरक्षिततेला : आरोग्याची काळजी घेण्याचा विसर, महापालिका पथकाकडून कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदी करता यावे, यासाठी दररोज सकाळी ८ ते १२ या वेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे. हे वारंवार सांगितले जात असूनही इतवारा बाजारात बुधवारी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी अमरावतीकरांनी गर्दी केली. ‘स्वत:ला जपा, सुरळीत काळजी घ्या’ या ‘कोरोना नियंत्रणा’चा विसर पडल्यागत नागरिकांना येथे संचार होता, हे विशेष.महानगरात भाजीपाला, किराणा, मसाले पदार्थ, अन्नधान्यासाठी इतवारा बाजाराला सर्वांचीच पसंती असते. संचारबंदी शिथिल असल्याच्या काळात आणिं गुढीपाडव्याच्या सुटीमुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. यामुळे दुकानदार, भाजीविक्रेत्यांची भंबेरी उडाली. अगोदर नागरिक कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या सावटात भयभीत झाले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तू खरेदी करताना चार तासांच्या कालावधीत जी मिळेल ती वस्तू खरेदी करण्याची मानसिकता नागरिकांची झाली आहे.एकच गर्दी झाल्यामुळे इतवारा बाजारात काहीवेळ रेटारेटी झाली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवण्याच्या सूचनेला यावेळी बगल देण्यात आली. वस्तू खरेदीच्या वेळी झालेल्या गर्दीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले. अखेर महापालिका फिरत्या पथकाने या गर्दीवर अंकुश मिळविला. दुकानदारांना नियोजनबद्धतेने वस्तू विक्री करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. नागरिकांनी सामाजिक कर्तव्य आणि प्राप्त परिस्थितीचा विचार करून वर्तन करावे, अशा सूचना महापालिका पशुवैद्यकीय अधिकारी सचिन बोंद्रे यांनी इतवारा बाजारातील गर्दी पांगविताना केल्यात.आता इतवारा बाजारात मिळेल फक्त किराणाइतवारा बाजारात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आता येथे केवळ किराणा माल मिळणार आहे. इतवारा बाजारात फक्त किराणा दुकाने सुरू राहतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भाजी विक्रीची दुकाने बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहे.अ‍ॅकेडमिक स्कूलमध्ये भाजी विक्री होणारवलगाव मार्गावरील अ‍ॅकेडमिक स्कूलच्या प्रांगणात आता भाजीपाला विक्री होणार असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. इतवारा बाजारात भाजीपाला खरेदीदरम्यान उसळणारी गर्दी ही कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरणारी आहे. त्यामुळे इतवारा बाजारातून अ‍ॅकेडमिक स्कूलच्या प्रांगणात भाजी विक्री होणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार