शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

वांझोटे बियाणे उठले शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:07 IST

गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत १०० वर तक्रारी संबंधित तालुक्यात दाखल झाल्याच्या वृताला कृषी विभागाने सोमवारी दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे सावट : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची उगवणच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. याबाबत १०० वर तक्रारी संबंधित तालुक्यात दाखल झाल्याच्या वृताला कृषी विभागाने सोमवारी दुजोरा दिला आहे.यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने ६० दिवसांच्या अल्प कालावधीतील मूग, उडदाचे पीक बाद होऊन सोयाबीनमध्ये क्षेत्र रूपांतरित होत आहे. त्यामुळे अचानकपणे सोायाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली व बियाण्यांचे नियोजन कोलमडले आहे.जिल्ह्यात अचलपूर तालुक्यात कोल्हा-काकडा, रासेगाव, असदपूर, भातकुली तालुक्यात टाकरखेडा संभूमध्ये महाबीज व दर्यापूर तालुक्यात येलकी, यरंडी, गणेशपूर, दारापूर, शिंगणापूर आदी गावांमध्ये मयुर व सुंदरम या बियाणे कंपनी विरोधात शेतकºयांच्या कृषी विभागाकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. सोयाबीन बियाण्यांच्या वाणाची उगवण फारच कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक असताना तुरीची उगवण क्षमता चांगली झाली. त्यामुळे पावसाचा खंड आदी कुठलेही कारण या ठिकाणी देता येणार नाही.जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषी आयुक्तांचे १७ आॅक्टोबर २०१३ च्या आदेशान्वये पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना झालेली आहे. या समितीद्वारा काही तक्रारींची पाहणी करण्यात आली. याविषयीचा अहवाल अद्याप अप्राप्त असला तरी बहुतांश ठिकाणी बियाण्यांची गुणवत्ता खराब असल्याने उगवण झालेली नसल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाºयाने सांगितले.याबाबत महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक प्रवीण देशमुख यांच्याशी संपर्क केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.उपविभागीय कृषी अधिकारी समितीचे अध्यक्षबियाणे, खते व कीटकनाशकासंदर्भात शेतकºयांच्या तक्रारीची गंभीरपणे दखल घेण्यासाठी कृषी आयुक्तांचे आदेशान्वये जिल्ह्यातील १४ तालुक्यात पाच सदस्यीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या समितीमध्येसबंधीत तालुका कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्र व महाबीजचे प्रतिनिधी तसेच पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी सदस्य आहेत. तालुक्यात तक्रार होताच तिची नोंदवहीत नोंद घेऊन लगेच समिती अध्यक्षांकडे पाठविणे बंधनकारक आहे.तक्रारीनंतर सात दिवसांत शेताची पाहणी अनिवार्यतक्रार प्राप्त होताच ७ दिवसांच्या आत समिती अध्यक्षांनी समिती सदस्यांची भेट घेणे व सर्व सदस्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे.शेतकºयांकडे निविष्ठा खरेदीच्या पावत्यांची शहानिशा करून विहीत प्रपत्रात पंचनामा करून प्रत शेतकरी व कंपनीच्या प्रतिनिधींना देणेतक्रार अशलेल्या बियाण्याच्या प्लॉटचट नमुना घेवूण अधिसुचित प्रयोगशाळेत तपासणी करावयास पाठवीणे बंधनकारक आहे.तक्रार ज्या कंपनी विरोधात आहे. त्यांच्या प्रतिनिधीला व कृषी विके्रत्याला पाहणीच्या वेळी बोलावणे, त्यांची व शेतकºयाची साक्ष घेणे बंधनकारक