शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास ! भंगार विक्रेत्याचा मुलगा झाला कर सहायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 17:59 IST

भंगार विक्रेत्याचा मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक या पदाच्या परीक्षेत खुल्या संवगार्तून राज्यातून अव्वल

ठळक मुद्देएमपीएससीतून राज्यात अव्वल दर्यापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

सचिन मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: येथील भंगार विक्रेत्याचा मुलगा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या कर सहायक या पदाच्या परीक्षेत खुल्या संवगार्तून राज्यातून अव्वल आला आहे . अपार कष्ट, जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या बळावर मो. शाहीद मो. अयुब (२७) याने ही किमया केली. दर्यापूर तालुक्याच्या शिरपेचात त्याने आपल्या यशाने मानाचा तुरा खोवला.सन २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या कर सहायकपदाच्या परीक्षेचा ऱ्यांनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. राज्यात मो. शाहीद अव्वल आल्याचे कळताच दर्यापुरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील राठीपुरानजीक राहणाऱ्या मोहम्मद शाहीद याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून २०१६ मध्ये बी.ए. पदवी संपादन केली. प्राध्यापक गजानन कोरे यांच्या मार्गदर्शनात २०१३ पासून त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. २०१७ मध्ये तो पोस्टाची परीक्षा उत्तीर्ण झाला. २०१९ मध्ये पुन्हा एसटी महामंडळाची परीक्षा दिली. त्यामध्ये तो सुरक्षा निरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याची आर्डर घरी आली असतानाच कर सहायकपदाच्या परीक्षेत राज्यातून अव्वल आल्याची वार्ता धडकली. येथेच न थांबता उपजिल्हाधिकारी पद मिळवायचे असल्याची मनीषा त्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यादरम्यान मंत्रालय सहायक म्हणूनसुद्धा संधी मिळाली असल्याचे त्याने सांगितले.अन्य एका भावाचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्याला वडील हातभार लावतात. यादरम्यान त्याच्या यशाचे कौतुक करण्यासाठी बुधवारी त्याच्या घरी दिवसभर नेतेमंडळी व आप्तांचा राबता होता.मी ज्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थी होतो, तेथेच मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांनाही शिकविले. माझ्या यशात मोठा भाऊ रेहान व गजानन कोरे यांचा सिंहाचा वाटा आहे. पुढे उपजिल्हाधिकारी व्हायचे आहे.- मोहम्मद शाहीद, दर्यापूरमोहम्मदचा मोठा भाऊ शासकीय नोकरीत लागल्याने त्याच्याकडूनच त्याने प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षेच्या क्लासमध्ये आला. त्यानंतर त्याने जिद्दीने व मेहनतीने हे यश संपादन केले.- गजानन कोरे, प्राध्यापक, दर्यापूर

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा