बडनेरा (अमरावती) : नवी दिल्लीच्या लाल किल्ला येथून प्रारंभ झालेली अहिंसा संदेश यात्रा बुधवारी बडनेरा शहरात पोहोचली. येथील जैन बांधवांनी भावपूर्ण स्वागत केले. आचार्य महाश्रमणजी यांच्या नेतृत्वात यात्रा देशभरात भ्रमंती करीत आहे.लाल किल्ल्यापासून ९ नोव्हेंबर २०१४ रोजी अहिंसा संदेश यात्रा सुरू झाली. तीन देश व भारतातील २० राज्यांमधून १५ हजार किलोमीटरचा प्रवास यात्रेचा होणार आहे. सद्भावना आणि नैतिकतेचा प्रचार व प्रसार तसेच व्यसनमुक्ती अभियान हे या यात्रेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. (welcome to Jains from Ahimsa Yatra in Badnera)
अहिंसा यात्रा ७ एप्रिल रोजी बडनेरा शहरात सकाळच्या सुमारास पोहोचली. शहरातील जैन बांधवांनी यात्रेचे भव्य स्वागत केले. यात्रेसोबत ५० साधू, साध्वी आचार्य महाश्रमणजी यांच्यासमवेत आहेत. बडनेरा शहरात आरडीआयके महाविद्यालय येथे यात्रेचा एक दिवस मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी ही यात्रा अकोला मार्गाकडे रवाना होणार आहे.
याप्रसंगी कोरोनाचे सर्व नियम पाळून आचार्य महाश्रमणजी यांचे दर्शन घेण्यात आले. अहिंसा यात्रेतील मुख्य संदेश मुक्कामाच्या ठिकाणी ते मांडत असतात. अहिंसा संदेश यात्रेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अनेक राज्यांतून यात्रा संदेश प्रसारित करीत पुढे मार्गस्थ होत आहे.