शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभर उसंत, तुरळक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 01:02 IST

जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देहवामानतज्ज्ञांची माहिती : १७ तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात २६ जुलैपासून असलेल्या झडसदृश स्थितीनंतर शनिवारी पहिल्यांदा सूर्यदर्शन झाले. आता आठवडाभर पावसाची उसंत राहणार आहे. दरम्यान तुरळक ठिकाणी श्रावणसरी राहतील. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.गेल्या २४ तासांत धारणी तालुका वगळता पाऊस निरंक राहिला. जिल्ह्यात १ जून ते ९ आॅगस्ट या कालावधीत ५००.४ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५५३.३ मिमी पावसाची नोंद झाली. ही ११०.६ टक्केवारी आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्याने पावसाची सरासरी पार केलेली आहे. विशेष म्हणजे यंदाचा निम्मा पावसाळा झाल्यानंतर दहा तालुक्यांत पावसाने सरासरी पार केलेली आहे.यामध्ये अमरावती ११०.७ टक्के, भातकुली ६९.५, चांदूर रेल्वे १२४, धामणगाव १२८.३, अचलपूर ११८.४, चांदूर बाजार १४१.३, दर्यापूर १०९.५, अंजनगाव सुर्जी ११५.७, धारणी १३३.९ तर चिखलदरा तालुक्यात सरासरीच्या ११९.४ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाच्या १२० पैकी ७१ दिवसा झाले असतांनाही भातकुली तालुक्यात ६९.५ टक्के, नांदगाव खंडेश्वर ९८.३, तिवसा ९६.४, मोर्शी ८९.८ व वरुड तालुक्यात ८३.८ टक्के पाऊस पडल्याने हे पाच तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.हवामानाची सद्यस्थिती४ तारखेला बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर गुजरात, दक्षिण राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्रात आहे. सोबत चक्राकार वारे आहेत. उत्तर बंगालच्या उपसागरावर व आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर चक्राकार वारे वाहिल्याने विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असले तरी १७ आॅगस्टपर्यंत पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील. १२ तारखेला उत्तर बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ही प्रणाली वायव्य दिशेने सरकरणार असल्याची शक्यता असल्याने मध्य भारतात पावसात वाढ होईल, त्याचा विदर्भाला फारसा फायदा होणार नसल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.

टॅग्स :ChikhaldaraचिखलदराRainपाऊस