शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

महाविकास आघाडीचा ऑटो लवकरच पंक्चर करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 20:18 IST

Amravati News महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, हा तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केला जाईल, असा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकात बावनकुळे यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कळेना

लोकमत न्यूज नेटवर्क  

अमरावती : महाविकास आघाडीला सत्तेचा माज आला असून, हा तीनचाकी ऑटो लवकरच पंक्चर केला जाईल, असा इशारा राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकात बावनकुळे यांनी दिला आहे.

(We will soon puncture the cart of Mahavikas Aghadi)

बावनुकळे हे ‘युवा वॉरियर्स’ अभियानांतर्गत अमरावतीत गुरुवारी आले असता, पत्रपरिषदेतून भाजपची पुढील वाटचाल विशद केली. १८ ते २५ वयोगटातील युवक, युवतींना देशाच्या जडणघडणीत सहभागी करून घेण्यासाठी हा उपकम असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यातील जनता महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहे. येत्या जिल्हा परिषद, महापालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजप जनतेपर्यंत पाेहोचून महाविकास आघाडीने भकास कसे केले, याची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीर अटक केली, हे न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन देऊन सिद्ध केले आहे.

शिवसेनेला सत्तेचा माज आला आहे. येत्या निवडणुकांमध्ये सेनेला जागा ठेवणार नाही, असे भाजपचे नियोजन आहे. अमरावती शहरात शिवसेनेने धुडघूस घातला असून, गुंड सैनिकांना अटक व्हावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कळत नाही, राज्य कसे कळणार, असा टोलाही लगावला. याबाबत भाजपकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले जाणार आहे. पत्रपरिषदेला भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, शहराध्यक्ष किरण पातूरकर, आमदार प्रवीण पोटे, महापौर चेतन गावंडे, भाजपचे पक्षनेता तुषार भारतीय, माजी मंत्री अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी उपस्थित होते.

 

भाजप-युवा स्वाभिमान एकत्र नाही

भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र निवडणूक लढणार नाही, ही बाब चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली. आमदार रवि राणा हे भाजपचे सहयाेगी सदस्य आहे. त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद अथवा नगर परिषद निवडणुका भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र लढणार, ही केवळ चर्चा असल्याचे बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे