शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही ४२४ टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 15:41 IST

पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही सरासरी २८ टक्के पावसाची तूट असल्याने व-हाडातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झालेली नाही.

अमरावती : पावसाळ्याच्या ४० दिवसांनंतरही सरासरी २८ टक्के पावसाची तूट असल्याने व-हाडातील पाणीटंचाईची तीव्रता कमी झालेली नाही. सद्यस्थितीत ४२ तालुक्यांतील ४१६ गावांमध्ये ४२४ टँंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. याशिवाय तात्पुरती उपाययोजना या अर्थाने २३७२ विहिरी दोन हजारांवर गावांची तहान भागवित असल्याचे पश्चिम विदर्भातील वास्तव आहे. यंदाच्या पावसाळ्यात १० जुलैपर्यंत सरासरी २३४.९ मिमी पावसाची अपेक्षित असताना प्रत्यक्षात १६६.१ मिमी पावसाची नोंद झाली. ही ७२ टक्केवारी आहे. गतवर्षी याच तारखेला १८८.५ मिमी पावसाची नोंद झाली होती. यात फक्त बुलडाणा जिल्ह्यात १०३ टक्के पाऊस पडला. उर्वरित चारही तालुक्यांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. सरासरीच्या सर्वात कमी ४५.५ टक्के पाऊस यवतमाळ जिल्ह्यात झालेला आहे. अमरावती ६६.७, अकोला ८३.७ व वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ६४.४ टक्के  पाऊस पडला आहे.कमी पावसामुळे नदी-नाले प्रवाहीत नाही. प्रकल्प क्षेत्रातदेखील हीच स्थिती कायम असल्याने जलसाठा तसूभरही वाढलेला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचे जलास्त्रोत कोरडेच आहेत. जमिनीत आर्द्रताअभावी अर्ध्याअधिक क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. भर पावसाळ्यात ही स्थिती ओढावल्याने राज्य शासनाने पाणीपुरवठ्याच्या उपाययोजनांना १५ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. हा तहानलेल्या गावांना दिलासा असला तरी पावसाची एकंदरीत स्थिती व हवामानतज्ज्ञांची माहिती गृहीत धरता जुलैअखेरपर्यंत मुदतवाढ देणे महत्त्वाचे आहे. पश्चिम विदर्भात सद्यस्थितीत धारणी, तेल्हारा, बाळापूर, बुलडाणा चिखली, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर या तालुक्यात पावसाने सरासरी पार केली तर भातकुली, वरूड, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, मूर्तिजापूर, यवतमाळ, कळंब, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, केळापूर, घाटंजी, राळेगाव, झरी-जामणी, बुलडाणा व देऊळगाव राजा या तालुक्यात पावसाची सरासरी ५० टक्क्यांच्या आत आहे.या आहेत पाणीटंचाईच्या उपाययोजनापश्चिम विदर्भात जुनअखेर ७७६ विंधन विहिरी, १२७ नळयोजनांची विशेष दुरूस्ती, ७४ तात्पुरत्या नळ योजनांची विशेष दुरूस्ती, ५६८ टँकर व २३७२ खासगी विहिरींचे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यासाठी एकूण ७८ कोटी ५५ लाख ५९ हजारांच्या निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विंधन विहिरींसाठी १०.२९ कोटी, नळ योजनांच्या दुरूस्तीसाठी १२.३७ कोटी, तात्पुरत्या नळ योजनांसाठी ९.७१ कोटी, टँंकरने पाणी पुरवठ्यासाठी ३२.६० कोटी, विहिरींच्या अधिग्रहणासाठी १३.५७ कोटींची आवश्यकता आहे.टँकरने पाणीपुरवठ्याची जिल्हानिहाय स्थिती (५ जुलै)जिल्हा        तालुके    गावे    लोकसंख्या     टँकरअमरावती    १०    ५६    १,२२,७६६    ५७अकोला    ६    २९    ७१,९१९    ३४यवतमाळ    ८    ७२    १,१७,४४०    ७२बुलडाणा    १२    १९३    ३,७७,७९७    १९७वाशिम        ६    ६६    १,१४,२३६    ६४एकूण        ४२    ४१६    ८,०४,१५८    ४२४