शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात पाणीटंचाई; निवारणार्थ ७.३१ कोटींची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 12:24 IST

वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना अशा उपायोजना सूचविल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने त्यााठी ७३१.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ठळक मुद्दे१११ गावांत १०१ टँकरने पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वऱ्हाडातील अकोला, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या नळ योजना अशा उपायोजना सूचविल्या आहेत. पाणी पुरवठा विभागाने त्यााठी ७३१.३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ राबविलेल्या, राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरील खर्च या निधीतून भागविला जाईल.पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने २७ मार्च रोजी नाशिक विभागाला ३०२.९३ लाख, औरंगबाद विभागाला ४२१.१० लाख, अमरावती विभागाला ७३१.३५ लाख असे एकूण १४५५.३९ लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे.अमरावती विभागातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४४.१८ लाखांतून विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. या तिन्ही जिल्ह्यांतील नागरी भागात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ६८७.१७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अमरावती, नाशिक आणि औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी हा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करीत असताना तो उपयोजनानिहाय वितरित होईल, याची दक्षता देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.१११ गावांत १०१ टँकरने पाणीपुरवठाअकोला जिल्ह्यातील ६४ गावांना ५४ टँकरने, वाशिम जिल्ह्यातील ७ गावांना ७ टँकरने, बुलडाणा जिल्ह्यातील १८ गावांना १८ टँकरने, तर यवतमाळातील २२ गावांना अशा एकूण १११ गावांना १०१ टँकरने तूर्तास पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील एकाच गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आल्याची नोंद विभागीय आयुक्तालयात करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी