शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटला पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

मेळघाटात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना विविध कारणांनी बंद पडल्या. येथे सोलर पंपावर पाणीपुरवठा योजना असली तरी आदिवासींना हातपंपावर गर्दी करावी लागत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी केल्यानंतर महावितरणकडून पुरवठा घेण्याचे निर्देश चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिले.

ठळक मुद्देअनेक गावात विहिरींचे अधिग्रहण : योजना बंद पडल्या, चिखलदऱ्यातील पाच गावांना टँकरने पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : उन्हाची दाहकता जाणवू लागली असतानाच लॉकडाऊन झाल्याने कामांची गती मंदावली आहे. त्यातच मेळघाटातील आदिवासींची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. तालुक्यातील पाच गावांमध्ये मंगळवारपासून टँकरने पुरवठा केला जात आहे, तर दहा गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.मेळघाटात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना विविध कारणांनी बंद पडल्या. येथे सोलर पंपावर पाणीपुरवठा योजना असली तरी आदिवासींना हातपंपावर गर्दी करावी लागत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी केल्यानंतर महावितरणकडून पुरवठा घेण्याचे निर्देश चिखलदराचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दिले.सोनापूरमधील एकझिरा, बगदरी, सोमवारखेडा, मलकापूर, आकी या गावांमध्ये तात्काळ पाच टँकर सुरू करण्यात आले आहे. कोरडा, हतरू, कुलंगना खु, सावरपाणी, खंडूखेडा आदी जवळापास दहा गावांतील विहिरी अधिग्रहीत करण्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.१५ गावांत टँकरने पुरवठाउन्हाळ्यात चिखलदरा तालुक्यातील आदिवासींना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तारूबंदा, भांद्री, लवादा (शहापूर), सोमवारखेडा, खिरपाणी, आडनदी, सोनापूर, मलकापूर, बहादरपूर, धरमडोह, मनभंग, पिपादरी, पाचडोंगरी, आकी, कोयलारी, बगदरी, एकझिरा अशा १५ गावांमध्ये पहिल्या टप्प्यात भीषण पाणीटंचाई पाहता, टँकरने पुरवठा केला जाणार आहे. अंबापाटी, बिहाली, नवलगाव, राक्षा, भांडुम येथील पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती तसेच बोरी, जामुननाला, हिरडा, हिरदामल येथे तात्पुरती योजना मंजूर करण्यात आली आहे.तालुक्यातील १५ तीव्र टंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. मंगळवारपासून पाच गावांमध्ये पुरवठा सुरू करण्यात आला. काही गावांतील नळ योजना दुरुस्ती व तात्पुरत्या नवीन मंजूर करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.-प्रकाश पोळ, गटविकास अधिकारी चिखलदरा

टॅग्स :water shortageपाणीकपातMelghatमेळघाट