जिल्हा परिषद; सीईओंचा मेळघाटात दौरा
अमरावती : सध्या उन्हाळ्याचे शेवटचे दिवस असल्याने मेळघाटात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. ही टंचाई निवारणार्थ केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंगळवारी चिखलदरा तालुक्यात दौरा करून प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. दरम्यान अधिकाऱ्याकडून आढावा घेतला.
चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त असणाऱ्या एकझिरा गावाला भेट देऊन पाणीटंचाईचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजना करण्याची विनंती केली.
चिखलदरा तालुक्यातील सर्वाधिक टंचाईग्रस्त असणाऱ्या एकझिरा गावाला सीईओंनी भेट देऊन येथील विहिरींची कामांची पाहणी केली. नागरिकांसोबतही पाणी टंचाईबाबत संवाद साधला. यावेळी त्यांनी पाणीटंचाईचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी नागरिकांनी पाणीटंचाईवर शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी सीईओंकडे केली. यासोबतच मेळघाटातील मी समृद्ध तर गाव समृद्ध, याअंतर्गत झालेल्या नियोजनाचा आढावा घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लखपती करण्याच्या सूचना पंडा यांनी केल्या. रोजगार हमीला केंद्रस्थानी ठेवून सर्वांगीण विकास व्हावा, ही अपेक्षा सीईओ अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केली. यावेळी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी मंदार पत्की, रोहयोचे डेप्युटी सीईओ प्रवीण सिन्नारे, पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, बीडीओ प्रकाश पोळ, उपअभियंता दीपेंद्र कोराटे उपस्थित होते.
बॉक्स
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा आढावा
चिखलदरा तालुक्यातील मोथा, मडकी, जैतादेही, एकझिरा या गावांना सीईओंनी भेट देऊन कोरोना परिस्थिती जाणून घेतली. यावेळी ग्रामस्तरीय कोरोना दक्षता समितीशी संवाद साधला. मडकी येथे अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण न आढळल्याबद्दल ग्रामवासीयांचे कौतुक करत लवकरात लवकर सर्व गावातील पात्र व्यक्तींचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना दिल्या. यानंतर चिखलदरा येथील कोविड केअर सेंटरची पाहणी करून संक्रमित रुग्णांना संस्थात्मक विलगिकरणात ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रधान, डॉ. पांडे उपस्थित होते.