शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जलवाहिनी फुटली, तीन दिवस पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:30 IST

वादळी पावसाने वाहिन्यांवर वृक्ष कोसळून वीजपुरवठा खंंडित झाल्याने सिंभोरा धरणावरील पाणीपुरवठा करणारे पंप बंद पडले. सोमवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर धरणावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरविले गेले. मात्र, अचानक माहुली ते नांदगाव पेठ दरम्यान जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटरची गळती सुरु झाली. त्यामुळे पंप बंद करून पाइप लाइन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलाखो लिटर पाण्याची गळती : अमरावतीकरांसमोर पुन्हा जलसंकट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वादळी पावसाने वाहिन्यांवर वृक्ष कोसळून वीजपुरवठा खंंडित झाल्याने सिंभोरा धरणावरील पाणीपुरवठा करणारे पंप बंद पडले. सोमवारी दुपारी वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर धरणावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पुरविले गेले. मात्र, अचानक माहुली ते नांदगाव पेठ दरम्यान जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटरची गळती सुरु झाली. त्यामुळे पंप बंद करून पाइप लाइन दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परिणामी आता पुढील तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.उन्हाळ्याच्या अखेरीस अमरावतीकरांची पाण्याची मागणी वाढली असताना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करणाऱ्या जीवन प्राधिकरणाने सुरळीत पाणीपुरवठा करण्याची ग्वाही अमरावतीकरांना दिली होती. तरीसुद्धा अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना अमरावतीकरांना करावाच लागत आहे. एकीकडे जमिनीतील पाण्याची पातळी खालावली, तर दुसरीकडे जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा नियोजनाचा बट्ट्याबोळ झाला आहे. रविवारी सायंकाळी जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. त्यावेळी आलेल्या वादळी वाºयात सिंभोराजवळील विद्युत तारेवर वृक्ष कोसळून वीजपुरवठा खंडीत झाला. विजपुरवठ्यावर चालणारे सिंभोरा धरणातील पंप बंद पडल्यामुळे पाणीपुरवठाही बंद झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धस्तरावर करण्यात आल्याने सोमवारी दुपारी १२.३० वाजता वीजपुरवठा पूर्वरत झाला. मात्र, अडीच तासांतच मजीप्राची माहुली जहागीर ते नांदगावपेठ दरम्यानची मुख्य पाइप लाइन फुटून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. कालबाह्य पीएससी पाइप लाइन फुटल्याने पुन्हा सिंभोरातील पंप बंद करण्यात आले. तीन मीटर खोल असणाºया पाइप लाइन दुरुस्तीचे काम मजीप्राने सुरू केले असून, दिवसरात्र काम करून नवीन लोखंडी पाइप लाइन टाकण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे. मात्र, या दुरुस्तीसाठी तीन दिवस लागणार असल्याने हा कालावधी अमरावतीकरांसाठी पाणीसंकट निर्माण करणाराच राहणार आहे.पॅरलल फीडरची सोय नाहीमजीप्राकडे ९० हजारांवर ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना सिंभोरा धरणातून पाणी उचलणाºया पंपांना पॅरलल फीडरची सोय नाही. मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता अशा वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत विचार केला नाही, हे विशेष.बदलविले जातील पाईपमजीप्राची मुख्य पाणीपुरवठा पाइप लाइन पीएससीची असून, ती कालबाह्य झाली आहे. तीन मीटर खोलीवरील या लाइनच्या दुरुस्तीत तीन-चार दिवस जातील. त्याऐवजी लोखंडी पाइप टाकण्याचे काम केले जाईल, अशी माहिती शाखा अभियंता अजय कर्नेवार यांनी दिली.