शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

अमरावतीमधील कम्पोस्ट डेपोमुळे ९०० टीडीएसपर्यंत जलप्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 12:44 IST

शहरालगतच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोमुळे या भागातील बोअरच्या पाण्यात ९०० टीडीएसपर्यंत प्रदूषित घटक आढळले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार जडले आहेत.

ठळक मुद्दे१८ वर्षांपूर्वीच संपली डेपोची मुदत महापालिका प्रशासनाचा नागरिकांच्या जिवाशी खेळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरालगतच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपोमुळे या भागातील बोअरच्या पाण्यात ९०० टीडीएसपर्यंत प्रदूषित घटक आढळले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांना अनेक आजार जडले आहेत.कम्पोस्ट डेपोत कचरा टाकण्याची मर्यादा १८ वर्षांपूर्वीच संपली. भागातील नागरिकांनी केला. महापालिका प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचा आक्षेप नागरिकांना महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. कम्पोस्ट डेपोला खेटून हनुमाननगर, हैदरपूरा, भाजीबाजार, खोलापुरी गेट, पठाणचौक, लालखडी, महाजनपुराआदी अनेक जुन्या वस्त्या आहेत. या कंपोस्ट डेपोची मर्याचा सन २००० मध्ये संपुष्टात आली. त्यानंतरही १८ वर्षांपासून येथे दररोज ३०० ते ४०० ट्रक कचरा रिचविला जात आहे. त्यामुळे वातावरण प्रदूषित झालेले आहे. अनेक नागरिक आजाराचे बळी ठरत आहेत.सुकळीच्या नावावर पेठ अमरावतीला डेपोमहापालिकेद्वारा सुकळी येथे डेपो दाखविण्यात येत असला तरी प्रत्यक्षात हा कम्पोस्ट डेपो मौजा पेठ अमरावती भागात आहे. महापालिकेने यासाठी कवडीमोल भावाने जमिनी खरेदी केल्याचा आरोप दिनेश वडुरकर, मोहमद अफसर, शेखर पवार, शेख शकील, मो. सलीम, अ. शकील, अ. सत्तार, अताउल्ला खाँ आदींनी दिलेल्या निवेदनात केला आहे.धुळीमुळे कोणतेही पीक घेणे कठीणसन १९९९ मध्ये या भागातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी महापालिकेच्या अधिकाºयांनी अकोली वळणरस्त्याच्या नावाने शेतकºयांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी केल्या. आता प्रत्यक्षात या जमिनीचा उपयोग कचरा वाहतुकीसाठी केल्या जात आहे. या रस्त्याने ट्रकची वाहतूक असल्याने रात्रंदिवस धूळ व मातीचा थर लगतच्या शेतांमधील पिकांवर साचतो. परिणामी या शेतांमध्ये कोणत्याही प्रकारच्या पिकाचे उत्पन्न येत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

टॅग्स :Healthआरोग्य